एक्स्प्लोर

ISRO Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांना ISRO मध्ये नोकरीची संधी, 31 डिसेंबर आधी करा अर्ज

Government Job : दहावी पास उमेदवारांनी ISRO मध्ये नोकरीची संधी आहे. इस्रोने टेक्निशियन-बी पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

ISRO Bharti 2023 Technician - B Posts : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोमध्ये (ISRO) नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. इस्रोने टेक्निशियन-बी पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी isro.gov.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. शेवटच्या संधीची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करुन या संधीचा फायदा घ्या.

ISRO Recruitment 2023 Technician B Post : महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 9 डिसेंबर 2023 

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 

ISRO Recruitment 2023 Technician B Post : भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय?

इस्रोच्या या भरतीसाठी कोण-कोण अर्ज दाखल करु शकतो जाणून घ्या.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय, त्याच्याकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा असण आवश्यक आहे. हा डिप्लोमा NCVT द्वारे मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे. इस्रोच्या या भरती राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरसाठी आहेत.

ISRO Recruitment 2023 Technician B Post  : वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असणं गरजेचं आहे. पात्रेसंबंधित इतर तपशील तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचनेवरून तपासू शकता.

ISRO Recruitment 2023 Technician B Post : निवड कशी होईल?

या भरतीसाठी लेखी परीक्षा (Written Test) आणि कौशल्य चाचणीद्वारे (Skill Test) उमेदवारांची निवड केली जाईल. 

ISRO Recruitment 2023 : अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्जाची फी 100 रुपये आहे. सुरुवातीला सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क प्रक्रिया शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. एकूण 54 पदे भरण्यात येणार आहेत.

ISRO Recruitment 2023 : किती पगार मिळेल?

या पदांवर निवड झाल्यास, उमेदवारांना 21700 रुपये ते 69100 रुपये मासिक वेतन मिळेल. यासोबतच केंद्र सरकारच्या (Central Government) नियमांनुसार अनेक भत्तेही दिले जाणार आहेत. पदानुसार पगाराची श्रेणी बदलू शकते. सर्व तपशील जाणून घेण्यासाठी वेबसाइटवर दिलेली सूचना तपासणे चांगले होईल आणि त्यानंतरच अर्ज करा.

 महत्त्वाच्या इतर बातम्या :

Railway Recruitment 2023 : रेल्वेत बंपर भरती! 3000 हून अधिक रिक्त जागा; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget