IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती; कसा कराल अर्ज?
IB Recruitment 2023: इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये 200 हून अधिक पदं रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या.
IB Jobs 2023: उत्तम नोकरीच्या (Recruitment 2024) शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोनं (Intelligence Bureau Of Recovery) बंपर भरती जाहीर (Recruitment Announced) केली आहे. तसेच, भरतीसंदर्भात (Job Vacancy) एक अधिसूचनाही जारी केली आहे. ज्यानुसार IB मध्ये ग्रेड 2 च्या पदांवर भरती केली जाईल. या मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत साईट mha.gov.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे. तर, शेवटची तारीख संपल्यानंतर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. या भरती मोहिमेद्वारे गृह मंत्रालयाच्या (MHA) वतीनं इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) ग्रेड 2 च्या 226 रिक्त जागा भरल्या जातील.
शैक्षणिक पात्रता (Intelligence Bureau Of Recovery Recruitment Educational Eligibility)
इंटेलिजन्स ब्युरोनं जारी केलेल्या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी, उमेदवारांकडे GATE 2021, 2022, 2023 चं वैध स्कोअरकार्ड असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवारानं संबंधित क्षेत्रात BE/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा (Intelligence Bureau Of Recovery Recruitment Age Limit)
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल 27 वर्षांपेक्षा जास्त नसावं. नियमांनुसार, अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्जशुल्क (Intelligence Bureau Of Recovery Recruitment Application Fee)
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज फी म्हणून, सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्जशुल्क 200 रुपये ठेवण्यात आलं आहे. तर SC, ST, OH आणि महिला उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
अर्ज कसा करायचा?
स्टेप 1: सर्व इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी mha.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
स्टेप 2: आता उमेदवार मुख्यपृष्ठावरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता उमेदवारांना नवीन पृष्ठावरील पहिल्या नोंदणी लिंकवर क्लिक करावं लागेल.
स्टेप 4: आता उमेदवारांनी कागदपत्रं अपलोड करावी.
स्टेप 5: नंतर उमेदवार अर्ज फी भरतील.
स्टेप 6: आता उमेदवारांनी फॉर्म सबमिट करावा.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.