Vacancy : रोज चॉकलेट खा आणि दर महिना 61 लाख कमवा
Chief Candy Officer's Position : एका चॉकलेटच्या कंपनीमध्ये चीफ कँडी ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येत आहे. पाच वर्षाची मुलंही या पदासाठी अर्ज करु शकतात. दररोज 117 चॉकलेट खाण्यासाठी या व्यक्तीला 61 लाख रुपये पगार मिळेल.
Candy Funhouse Chief Candy Officer Vacancy : अनेक जण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. यासाठी बहुतेक जण खूप मेहनतही घेताना दिसतात. अशात तुम्हाला सोप्या कामासाठी गलेलठ्ठ पगार मिळाला तर? हो सध्या अशाच एका नोकरीची चर्चा आहे. ही नोकरी आहे एका चॉकलेट कंपनी. या चॉकलेट कंपनीत तुम्हाला दररोज चॉकलेट (Candy) खाण्याचे पैसे मिळणार आहेत. या कंपनीची आणि या नोकरीची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. कॅनडामधील एका चॉकलेट कंपनीमध्ये ही नोकरीची संधी आहे.
कॅनडामधील एका चॉकलेटच्या कंपनीमध्ये तुम्हाला दररोज चॉकलेट टेस्ट करण्यासाठी लाखो रुपये पगार मिळणार आहे. दररोज चॉकलेट खाऊन तुम्ही दरमहा 61 लाख रुपये कमवू शकता. कॅनडामधील कॅनडामधील कँडी फन हाऊस (Candy Funhouse Vacancy) या चॉकलेट निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये चीफ कँडी ऑफिसर (Chief Candy Officer) पदासाठी भरती करण्यात येत आहे. पाच वर्षाची मुलंही या पदासाठी अर्ज करु शकतात. दररोज 117 चॉकलेट खाण्यासाठी या व्यक्तीला 61 लाख रुपये पगार मिळेल.
चीफ कँडी ऑफिसरचं काम चॉकलेट खाऊन याच्या चवीबाबत निष्कर्ष काढण्याचं आहे. तुम्हाला यासाठी चॉकलेट चाखून त्याच्या चवीबद्दल सांगायचं आहे. चॉकलेटची चव कशी आहे, यामध्ये काय बदल करता येतील, हे चीफ कँडी ऑफिसरला सांगावं लागेल. या कामासाठी तुम्हाला दरमहा 61 लाख रुपये पगार मिळेल. या भरतीची सध्या जोरदार चर्चा आहे.
पाच वर्षांची मुले देखील करु शकता अर्ज
या नोकरीसाठी केवळ प्रौढ व्यक्तीच नाही तर लहान मुलंही अर्ज करु शकतात. मोठ्या व्यक्तींसह पाच वर्षांची मुले देखील चीफ कँडी ऑफिसर पदासाठी अर्ज करू शकतात. प्रौढ किंवा बालकं सर्वांसाठी नियम समान आहेत. दिवसभरात किमान 117 कँडीज खा आणि तुमचं मतं नोदवा. कँडी फनहाऊसचे सीईओ जमील हेजाजी सांगतात की, सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या संख्येने लोक अर्ज करत आहेत. प्रत्येकजण चीफ कँडी ऑफिसर होण्यासाठी आणि चांगला पगार मिळविण्यासाठी आतुर आहे.
सोशल मीडियावर भरतीची जाहिरात व्हायरल
या भरतीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल जगभरातील लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. लोक आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या नोकरीबाबत कमेंट्स करत आहेत