(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CRIS Jobs 2022: ग्रॅज्युएट आहात? मग ही संधी सोडू नका, प्रतिमाह 48 हजार मिळवण्याची संधी
CRIS Jobs 2022: रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम सेंटरमध्ये काढण्यात आलीये बंपर भरती. भरती मोहीम 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. झटपट अर्ज करा.
CRIS Jobs 2022: नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार ज्यांनी डिप्लोमाचं शिक्षण, पदव्युत्तर किंवा पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती. रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम सेंटरमध्ये 24 पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. www.cris.org.in या अधिकृत साईटला भेट देऊन उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. ही भरती मोहीम 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण 24 पदं भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इतर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर पदवी/एमबीए/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इत्यादी विषयातील डिप्लोमा आणि इतर विहित पात्रता असणं आवश्यक आहे.
CRIS Jobs 2022: वयोमर्यादा
रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम सेंटरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 22 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल.
CRIS Jobs 2022: कशी होईल निवड?
रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम सेंटरमध्ये जाहीर भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT) च्या आधारे केली जाईल. CBT मध्ये, सामान्य योग्यता/ तर्क आणि संबंधित विषयातून प्रश्न विचारले जातील.
CRIS Jobs 2022: वेतनश्रेणी
रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम सेंटरमधील भरती प्रक्रियेत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 48,852 रुपये वेतन दिलं जाईल.
CRIS Jobs 2022: अर्ज कसा करायचा?
या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल आणि निश्चित करण्यात आलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच, 20 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करावा लागेल.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?