एक्स्प्लोर

BOI Recruitment 2024 : बँक ऑफ इंडियामध्ये 142 पदांसाठी भरती; उमेदवाराची पात्रता, निकष आणि अर्ज फी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर

BOI Recruitment 2024 : स्केल IV च्या अंतर्गत 142 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 10 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.  

BOI Recruitment 2024 : बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) माध्यमातून स्केल IV पर्यंत विविध स्ट्रीममध्ये अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत ते उमेदवार BOI bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाईटद्वारे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. स्केल IV च्या अंतर्गत 142 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 10 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.  

BOI भर्ती 2024 पात्रता काय असावी? 

जे उमेदवार खाली दिलेल्या निकषांद्वारे पात्र असतील ते उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा (BOI Age Limitations)

बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी भरती 2024 साठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचं वय 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे. उमेदवारांचा जन्म 2 फेब्रुवारी 1989, च्या आधी आणि 1 फेब्रुवारी 1999 च्या नंतर नसावा. 

शैक्षणिक पात्रता (BOI Officer Education Qualification)

बॅंक ऑफ इंडियामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. 

निवड प्रक्रिया (BOI Recruitment 2024 Apply Online)

अधिकारी पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल किंवा वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत इंग्रजी भाषेशी संबंधित प्रश्न, पोस्टशी संबंधित व्यावसायिक ज्ञान आणि बँकिंग उद्योगाच्या विशेष संदर्भात सामान्य जागरूकता यांचा समावेश असेल. इंग्रजी भाषा चाचणी वगळता वरील चाचण्या द्विभाषिक स्वरूपात, म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असतील. इंग्रजी भाषेची चाचणी ही पात्रतेची असेल म्हणजेच गुणवत्ता यादी तयार करताना इंग्रजी भाषेत मिळालेले गुण गणले जाणार नाहीत.

अर्ज फी (BOI Officer Fees)

सर्वसाधारण आणि इतरांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आणि SC/ST/PWD साठी रुपये 175 निश्चित केले आहे. फक्त मास्टर/व्हिसा/रुपे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड/मोबाईल वॉलेट, QR किंवा UPI वापरून पेमेंट केले जाऊ शकते.

अर्ज कसा करावा?

  • अधिकारी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सर्वात आधी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला https://bankofindia.co.in/. भेट द्यावी. 
  • यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवरील “Career” किंवा “Recruitment” या सेक्शनच्या लिंकवर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्ही “New Ragistration” किंवा “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.   
  • त्यानंतर अर्ज फी भरा.
  • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

SBI Recruitment 2024 : स्टेट बँकेत बंपर भरती, 7000 हून अधिक रिक्त पदांवर भरती; भरतीसंदर्भातील माहिती वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget