(Source: Poll of Polls)
BDL Recruitment 2022 : भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; त्वरा करा
Bharat Dynamics Limited Recruitment 2022 : भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. उमेदवारांनी अधिकृत साइटला भेट देऊन लवकरच अर्ज करावा.
Bharat Dynamics Limited Recruitment 2022 : भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) नं सहाय्यक व्यवस्थापकासह (Assistant Manager) विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, या भरती मोहिमेद्वारे बीडीएलमध्ये (BDL) असिस्टंट मॅनेजर, सीनियर एज्युकेशन मॅनेजर आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट bdl-india.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे 18 पदं भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये महाव्यवस्थापक (एचआर), उपमहाव्यवस्थापक (सिव्हिल), व्यवस्थापक (स्फोटक), उपव्यवस्थापक (सिव्हिल) या पदांसाठी 1 जागा आणि कनिष्ठ व्यवस्थापक (रशिया/इंग्रजी भाषांतर), वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी 2 जागा रिक्त आहेत. तसेच, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी 3 जागा रिक्त आहेत. तर डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी 4 जागा रिक्त आहेत.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तसेच, SC/ST/PWBD/माजी सैनिक/अंतर्गत कर्मचार्यांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
असा करा अर्ज
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट bdl-india.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची प्रत "SM, C-HR (TA&CP), भारत डायनॅमिक्स लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, प्लॉट क्रमांक 38-39, TSFC बिल्डिंग (ICICI Towers), Financial District, Gachibowli, हैदराबाद, Telangana-500032" येथे सादर करावी लागेल. अर्जाची हार्ड कॉपी 23 ऑगस्ट 2022 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचली पाहिजे.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :