AIIMS Recruitment 2022 : एम्समध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांवर भरती; कोण करु शकतं अर्ज?
AIIMS Recruitment 2022 : या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिसूचना सविस्तर वाचू शकतात.
AIIMS Recruitment 2022 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) नं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) बिलासपूरमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार एम्स (AIIMS) बिलासपूर भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे. या भरती प्रक्रियेद्वारे AIIMS बिलासपूरमध्ये MTS ची एकूण 50 पदं भरली जातील. या रिक्त जागा (AIIMS Bilaspur Recruitment 2022) कॉन्ट्रॅक्ट आधारावर आहेत आणि फक्त ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो.
कोण अर्ज करण्यास पात्र?
बेसिल (BECIL AIIMS Bilaspur MTS Recruitment 2022) च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, इच्छुक उमेदवाराकडे किमान 100 खाटांच्या रुग्णालयात किमान एक वर्ष कामाचा अनुभव असावा. 45 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. याशिवाय उमेदवाराला कंम्प्युटरचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे.
यांना प्राधान्य दिलं जाईल
हॉस्पिटलमध्ये समान किंवा तत्सम क्षमतेनं काम केलेल्या किंवा काम करणाऱ्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. सुतारकाम आणि इलेक्ट्रिकल कामाचं ज्ञान असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल.
अर्ज फी
यासाठी सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय आणि महिला उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर, SC/ST/आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दिव्यांग उमेदवारांना 450 रुपये शुल्क भरावं लागेल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :