Bank Job : बँकेत नोकरीच्या शोधात आहात? आज अर्ज करण्याची शेवटची संधी; 250 पदांवर भरती
Bank of Baroda Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी 250 पदांवर भरती करण्यात येणार असून आज भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटच तारीख आहे.
BOB Senior Manager Recruitment 2023 : बँकत नोकरीच्या शोधात असाल तर, ही बातमी नक्की वाचा. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Vacancy) नोकरीची संधी आहे. या भरतीअंतर्गत 250 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये बँकेने वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) च्या 250 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजही शेवटची संधी सोडू नका. इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
BOB Recruitment 2023 : वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदामधील वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे असावे, तसेच उमेदवाराचं वय 37 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
BOB Senior Manager Recruitment 2023 : अर्ज शुल्क
BOB मधील वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल, तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील.
BOB Recruitment 2023 : BOB भरतीसाठी अर्ज कसा करावा
- या भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्वात आधी BOB च्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जावे लागेल.
- यानंतर मुख्यपृष्ठावरील करिअर लिंकवर क्लिक करा.
- आता एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना BOB वरिष्ठ व्यवस्थापक भरती 2023 लिंकवर क्लिक करावं लागेल.
- आता नोंदणीसाठी (Registration) आवश्यक तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा.
- अर्ज फी भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
- पेज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :