Agniveer Recruitment 2022 : अग्निवीरच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांची बँकांमध्येही होणार भरती; कंत्राटी पद्धतीने होणार निवड
Agniveer Recruitment 2022 : लष्करातील अग्निवीरांच्या धर्तीवर आता बँकांमध्येही कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे.
![Agniveer Recruitment 2022 : अग्निवीरच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांची बँकांमध्येही होणार भरती; कंत्राटी पद्धतीने होणार निवड agniveer there will be recruitment bank employees will be kept on contract marathi news Agniveer Recruitment 2022 : अग्निवीरच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांची बँकांमध्येही होणार भरती; कंत्राटी पद्धतीने होणार निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/315ee420b38e91cc4d78871826c1f45a1660817589283358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Agniveer Recruitment 2022 : लष्करातील अग्निवीरांच्या (Agniveer) धर्तीवर आता बँकांमध्येही कर्मचाऱ्यांना (Employees) सामावून घेतले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आपला खर्च कमी करण्यासाठी मानव संसाधनाशी संबंधित समस्यांसाठी स्वतंत्र कंपनी सुरू करणार आहे. स्टेट बँकेच्या ऑपरेशन आणि सपोर्ट उपकंपनीला अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) तत्वतः मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला, कंपनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील बँक शाखांमधील कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणार आहे.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हे पाऊल उचलून बँकेला त्यांचा खर्च-उत्पन्न गुणोत्तर कमी करायचे आहे. याचे कारण म्हणजे SBI ने देशभरात बँक शाखांचे खूप मोठे जाळे स्थापन केले आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत, SBI च्या एकूण परिचालन खर्चामध्ये पगाराचा वाटा सुमारे 45.7 टक्के होता आणि सेवानिवृत्ती लाभ आणि इतर तरतुदींचा वाटा 12.4 टक्के होता.
या संदर्भात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी डीएन त्रिवेदी यांनी सांगितले की, स्टेट बँक ऑपरेशन सपोर्ट सर्व्हिसेसद्वारे ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, त्या सर्व नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने असतील. एसबीआयच्या कायम कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व फायदे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मिळू शकणार नाहीत.
इतर बँकाही पुढे जाऊ शकतात
या नव्या प्रणालीचा परिणाम संपूर्ण बँकिंग उद्योगावर होणार आहे. SBI ऑपरेशन सपोर्ट सर्व्हिसेस ही भारतीय बँकिंग उद्योगातील आपल्या प्रकारची पहिली उपकंपनी असेल. मात्र, आता इतर बँकाही या दिशेने पावले टाकू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बँकांनी अशा प्रकारची उपकंपनी स्थापन करण्यासाठी आरबीआयला यापूर्वीच प्रस्ताव दिला होता, परंतु, त्यानंतर आरबीआयने परवानगी दिली नाही. परंतु, आता SBI कडून परवानगी मिळाल्यानंतर, इतर बँका देखील त्यांचे जुने प्रस्ताव पुन्हा एकदा पुढे नेण्यासाठी अशा उपकंपनीसाठी RBI कडून मंजुरी घेऊ शकतात. अशा प्रकारे अग्निवीर प्रमाणे ही एक नवीन जीर्णोद्धार योजना असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)