NIA Recruitment 2022 : NIA मध्ये बंपर भरती; प्रतिमाह 1 लाखांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी
NIA Recruitment 2022 : सेक्शन ऑफिसरच्या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 44900 रुपये ते 142400 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.

NIA Recruitment 2022 : गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं विभाग अधिकारी/कार्यालय अधिक्षक (SO/OS), सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक श्रेणी 1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) च्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर जाऊन अधिसूचना तपासू शकता. उमेदवार NIA MHA Recruitment 2022 साठी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात जारी केल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज करू शकतात. NIA ने 13 ऑगस्ट 2022 रोजी रोजगार वृत्तपत्रात ही अधिसूचना प्रकाशित केली आहे.
रिक्त जागांचा तपशील
भरतीअंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे सेक्शन ऑफिसरची 3 पदं, सहाय्यकांची 9 पदं, लेखापाल म्हणून 1 पद, स्टेनोग्राफर ग्रेड I ची 23 पदं आणि अप्पर डिव्हिजन लिपिक (UDC) च्या 12 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
वेतनश्रेणी
सेक्शन ऑफिसर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 7 अंतर्गत 44900 रुपयांपासून 142400 रुपयांपर्यंतचं वेतन दिलं जाणार आहे. असिस्टंट, अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी 35400 रुपयांपासून 112400 रुपयांपर्यंतचं वेतन मिळणार आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क पदांसाठी प्रतिमाह 25500 रुपयांपासून 81100 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी, असं NIA कडून सांगण्यात आलं आहे.
कसा कराल अर्ज?
पात्र उमेदवार त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रं 28 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेतील सरकारी नोकरीसाठी अधिसूचनेमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. विहित वेळेनंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
