एक्स्प्लोर
Advertisement
LIVE - नितीश कुमार यांचा शपथविधी
जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार हे सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात नितीश कुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यानंतर भाजप नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी भाजपच्या साथीने बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात जेडीयू आणि भाजपचे 13 -13 मंत्री असतील.
LIVE
Background
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा दिल्यानंतर रात्रभर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.
नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि भाजपचे 13-13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते सुशील मोदी हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
10:11 AM (IST) • 27 Jul 2017
10:34 AM (IST) • 27 Jul 2017
नितीश कुमार धोकेबाज, राहुल गांधी यांचं टीकास्त्र
10:07 AM (IST) • 27 Jul 2017
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
10:06 AM (IST) • 27 Jul 2017
10:28 AM (IST) • 27 Jul 2017
नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भारत
राजकारण
Advertisement