एक्स्प्लोर
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: स्वामी समर्थांमध्ये घडणार हनुमान तत्वाचा साक्षात्कार; हनुमान जयंतीनिमित्त विशेष भाग
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track:कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत हनुमान जयंतीनिमित्त दाखविण्यात येणारा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक गूढ, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track
1/10

"जगात दैवत्व एकच, देवा देवात भेद केलास आत्मपरीक्षण कर" – स्वामींचा हा अलौकिक संदेश या भागात प्रकट होतो.
2/10

या विशेष भागात स्वामी समर्थांच्या रूपात हनुमंत तत्वाचा साक्षात्कार होणार असून, स्वामींच्या चमत्कारिक रूपाने भक्तांना नव्या भक्तिभावाची प्रचीती येणार आहे.
3/10

या भागात अवधूत नावाच्या एका मारुतीभक्ताची कथा केंद्रस्थानी आहे, जो इतर कोणत्याही देवतेला मानत नाही.
4/10

स्वामींचा स्वीकार न करणारा हा भक्त मंदिर उभारणीच्या कामात अडथळे येऊ लागल्यामुळे संभ्रमात पडतो.
5/10

त्याला वाटतं की, स्वामी हेच कारण आहेत.
6/10

मात्र नाट्यमय घटनांनंतर त्याला जाणवतं की स्वामी समर्थ हेच हनुमंत तत्वाचे साक्षात स्वरूप आहेत.
7/10

मारुती आणि भीमाच्या ऐतिहासिक भेटीचं प्रभावी रिक्रिएशन या विशेष भागात दाखवण्यात येणार आहे, ज्यामुळे स्वामींच्या शक्तिरूपाचं तेजस्वी दर्शन घडणार आहे.
8/10

अवधूतला अखेर स्वामींमध्ये हनुमंताचे तत्व जाणवतं आणि तो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो.
9/10

स्वामी त्याला फक्त मंदिर उभारणीचं नाही, तर एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभं राहण्याचं महत्त्वाचं कार्य देतात – जसं प्रभू श्रीरामासाठी हनुमानाने सीतेच्या सन्मानासाठी संघर्ष केला होता.
10/10

या भागात भक्ती, शक्ती आणि समर्पण यांचा संगम पाहायला मिळणार असून, ही लीला प्रेक्षकांच्या मनावर अनामिक प्रभाव टाकून जाईल.
Published at : 10 Apr 2025 02:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















