बोल्ड कार सीन अन् यशचा धमाकेदार अॅक्शन; 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज, कधी होणार प्रदर्शित?
KGF Star Yash Stuns Fans With Toxic Teaser: केजीएफनंतर यशचा नवा राऊडी अवतार टॉक्सिकमध्ये पाहायला मिळणार. टिझर सोशल मीडियात व्हायरल.

KGF Star Yash Stuns Fans With Toxic Teaser: केजीएफ चित्रपटामुळे प्रकाशझोतात येणारा अभिनेता म्हणजेच यश लवकरच एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टॉक्सिक या चित्रपटात अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा बहुप्रतिक्षित टिझर रिलीज झाला. टिझर रिलीज होताच चाहत्यांची चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचा टिझर यशच्या वाढदिवशी म्हणजेच, 8 जानेवारी रोजी रिलीज झाला. टॉक्सिकमधील यशची भूमिका अतिशय राऊडी दाखवण्यात आली आहे. त्याच्या लूक आणि अंदाजमध्ये केजीएफची झलक पाहायला मिळत आहे. टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकवर्ग चित्रपटाची वाट पाहत आहेत.
अॅक्शनसोबत बोल्ड सीन्स
टॉक्सिकच्या टीझरमध्ये अॅक्शनसोबतच अतिशय बोल्ड सीनही दाखवण्यात आला आहे. केजीएफमध्ये अभिनेता यशचे नाव रॉकी भाई असे होते, तर टॉक्सिक चित्रपटात तो राया या पात्राची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स' असे आहे. या चित्रपटात आपल्याला अतिशय हिंसक आणि बोल्ड दृश्ये दाखवण्यात आली आहे.
टॉक्सिक चित्रपटाची तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात यशव्यतिरिक्त कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच नयनतारा आणि रूक्मिणी वसंत या अभिनेत्रींचाही या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटातील तगडी कलाकार पाहून, हा चित्रपट बिग बजेट असणार एवढं मात्र नक्की. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट, धुरंधरचा दुसरा पार्टही 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर नेमकं कोणता चित्रपट बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
टॉक्सिक चित्रपटाचा टीझर रिलीज
टीझरच्या सुरूवात होते. सुरूवातीला आपण हॉलिवूड चित्रपट पाहत असल्याचे वाटते. सुरूवातीचा सीन स्मशानभूमीत सुरू होता. नंतर एक कार सीन दाखवण्यात आला आहे. कार सीन अतिशय बोल्ड दाखवण्यात आला आहे. नंतर स्मशानभूमीत धमाका होतो. कारमधून यश बाहेर येतो. हातात बंदूक, काळे कपडे, तोंडात सिगार, त्याचा राऊडी लूक पाहून चाहते घायाळ झाले. दरम्यान, यशचा टॉक्सिक हा चित्रपट धुरंधर चित्रपटाला मागे टाकणार का? हे लवकरच कळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
























