World First Billionaire Actor: शाहरुख, सलमान, आमीर याच्या आसपासही नाही, यानं 28 वर्षांपासून अॅक्टिंगच केली नाही; तरीसुद्धा आज तो जगातील पहिला अब्जाधीश अभिनेता!
World First Billionaire Actor: आमीर, सलमान, अमिताभ याच्या आसपासही नाहीत, 28 वर्षांपासून अॅक्टिंगही केली नाही, तरीही आज तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जातो.

World First Billionaire Actor: जगभरातील सेलिब्रिटींमध्ये एक असा सेलिब्रिटी अॅक्टर (Celebrity Actor) आहे, ज्यानं वयाच्या 28 वर्षांपासून अभिनय केलाच नाही, पण तरीसुद्धा तो अब्जाधीश आहे. बॉलिवूड (Bollywood), हॉलिवूड (Hollywood) सोडा, हा अभिनेता जगातील पहिला अब्जाधीश अभिनेता आहे. 28 वर्षांपासून अॅक्टिंग न करताच, या पठ्ठ्यानं कमाईच्या बाबतीत टॉम क्रूज अन् शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे. म्हणजे, आमिर, सलमान, अमिताभ याच्या आसपासही नाहीत. पण, तुम्हाला माहितीय का? हा अभिनेता कोण?
1990 च्या दशकात जेव्हा मॅकॉले कल्किन आणि ऑलसेन ट्विन्स चाईल्ड आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत होते. त्याचवेळी ब्रॉक पियर्सही मागे नव्हता. ऐन उमेदीच्या काळा हा तरुण अभिनेता 'द माईटी डक्स' फ्रँचायझीमध्ये दिसला आणि त्यावेळी त्यानं इतर अनेक फिल्म्स आणि शो केले. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर पियर्सनं अभिनय सोडला, पण त्यावेळी तो टॉप अभिनेत्यांपैकी एक होता. त्यावेळी त्याचं मानधन भल्याभल्या अभिनेत्यांना लाजवणारं होतं. त्यामुळे त्याला जगातील पहिला अब्जाधीश म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पण तो एका असामान्य करिअर मार्गानं तिथे पोहोचला.
ब्रॉकनं लहानपणीच मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच टीव्ही जाहिरातींमध्ये दिसू लागला. अभिनेता म्हणून त्याला पहिलं यश 1992 मध्ये मिळालं, ज्यावेळी त्यानं अकराव्या वर्षी 'द माईटी डक्स' मध्ये काम केलं.
'द राईड' हा त्याचा शेवटचा स्क्रीन आऊटिंग
1994 च्या सिक्वेलमध्ये त्यानं त्याची भूमिका पुन्हा साकारली आणि फर्स्ट किड (1996) मध्येही त्यानं काम केलं. त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये 'लिटिल बिग लीग' (1994), 'रिपर मॅन' (1995), 'प्रॉब्लेम चाईल्ड 3: ज्युनियर इन लव्ह' (1995), 'थ्री विश' (1995) आणि 'अर्थ मायनस झिरो' (1996) यांचा समावेश आहे. 1197 मध्ये प्रदर्शित झालेला 'द राईड' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. तो फक्त 16 वर्षांचा होता, तेव्हा त्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अभिनयातून निवृत्ती घेतली.
ब्रॉक पियर्स अब्जाधीश कसा झाला?
1997 मध्ये, पियर्सनं जगातील सर्वात जुन्या ऑनलाईन व्हिडीओ कंटेंट प्रोवायडर्सपैकी एक असलेल्या डिजिटल एंटरटेनमेंट नेटवर्क (DEN) ची स्थापना करण्यात मार्क कॉलिन्स-रेक्टर आणि चाड शॅकली यांच्यासोबत अल्पसंख्याक भागीदार म्हणून भाग घेतला. वयाच्या 18 व्या वर्षी, पियर्स त्याच्या गुंतवणुकीमुळे दरवर्षी 250 डॉलर्स कमवत होता. 2001 मध्ये, त्यांनी इंटरनेट गेमिंग एंटरटेनमेंटची स्थापना केली, जी MMORPG करंट सेलिंग सर्विसमधील सर्वोच्च कंपनी होती. 2005 पर्यंत, कंपनीनं अमेरिकन बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबीज केला, वार्षिक उलाढाल अंदाजे 500 मिलियन डॉलर होती.
यामुळेच तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता
इतर अनेक सक्सेसफुल बिजनेस वेंचरनंतर, ब्रॉक पियर्स 2013 मध्ये क्रिप्टोकरन्सीकडे वळले. त्यांनी 'ब्लॉकचेन कॅपिटल' (BCC) या व्हेंचर कॅपिटल फर्मची स्थापना केली. पुढच्या वर्षी, त्यांनी क्रिप्टोकरन्सी टिथरची सह-स्थापना केली. 2018 मध्ये, फोर्ब्सनं त्यांना क्रिप्टोमधील टॉप 20 श्रीमंत व्यक्तींमध्ये स्थान दिलं, त्यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. यामुळेच तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला.
ब्रॉक पियर्स आज काय करतो?
2014 पासून, ब्रॉकनं स्वतः तीन डॉक्यूमेंट्रीमध्ये काम केलं आहे, परंतु अॅक्टिंग क्षेत्रात परतण्याचा त्याचा कोणताही प्लान नव्हता. 2017 मध्ये कथितरित्या आयर्लंडच्या शिथील टॅक्स रुल्समुळे तो Puerto Rico ला निघून गेला. 2020 मध्ये त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण त्यांना यश आलं नाही.
















