एक्स्प्लोर

मुंबईतील नाट्यगृहांची भाडी कमी होणार?

मुंबईतील नाट्यगृहांची भाडी कमी होणार असल्याची शक्यता आहे. 27 तारखेच्या महापौरांसोबतच्या बैठकीत घेतले जाणार महत्वाचे निर्णय.

मुंबई : हळूहळू जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागलं आहे. अनलॉकिंगची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाकडे येऊ लागली आहे. अशात सिनेमागृहं, नाट्यगृहं पुन्हा एकदा खुली होऊ लागली आहेत. अशात आता नाट्यसृष्टीची लगबग वाढू लागली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बसलेली खीळ आता सुटणार आहे. कारण पुन्हा एकदा अटीशर्तींसह नाटकं चालू होतील. याची सुरूवात पुण्यातून होणार आहेच. पण नाट्यसंस्थांना मुंबईत नाटकं करता यावीत म्हणून काही महत्वाचे निर्णय येत्या बैठकीत घेतले जाणार आहेत. मुंबई महापौराच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून 27 तारखेला ती पार पडणार आहे.

पुण्यातल्या अनेक प्रायोगिक नाट्यसंस्थांनी आपल्या नाट्यगृहांची भाडी कमी केली आहेत. सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे सभागृह आदींनी तर भाडं नाकारून केवळ प्रकाश, ध्वनि यंत्रणेचं भाडं देऊन नाटक करा असं आवाहन केलं आहे. दुसरीकडे ठाण्यातल्या नाट्यगृहांनीही आपली भाडी कमी केली आहेत. अशात मुंबईत काय निर्णय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर म्हणाले, 'नाटक करताना नाट्यगृहांची भाडी हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आता नव्याने नाटकांना सुरूवात होत असल्याने प्रेक्षकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे आत्ताच सांगता येणार आहे.

नाटक ही जिवंत कला असल्यामुळे एक प्रयोग करायचा असला तरी खर्च तेवढाच येत असतो. एरवी प्रेक्षकांची हमी असते. आता प्रेक्षकांची हमी देता येत नाही त्यात प्रेक्षागृहात निम्म्या प्रेक्षकसंख्येने नाटक करायचं आहे. अशात खर्चात कपात झाली तर नाटक करणं सोपं होईल. काही खर्च कमी झाले शिवाय, त्यात सरकारने काही मदत केली तर प्रेक्षकांच्या तिकिटातही काही सवलत देता येते का याचा विचार होऊ शकतो. याबद्दलच आता येत्या 27 तारखेला एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय घेतले जातील.'

'बॉब बच्चन'चा लूक आला समोर, सुजॉय घोषच्या नव्या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरूवात

नाट्यव्यवसायाचा पुनश्च हरिओम पाहता व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाच्या जागतिक रंगधर्मी नाट्यनिर्माता संघाने काही नव्या गोष्टी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार त्या संघाशी संबंधित कलाकारांनी आपली मानधनं 50 टक्क्यांनी कमी केली आहेत. नाट्यपरिषदेशी संलग्न असणारा निर्माता संघही काही योजना करण्याच्या विचारात आहे. आता ते निर्णय काय असतील याबाबत मात्र 27 तारखेनंतरच कळू शकणार आहे.

नाट्यव्यवसायाला आता शुभारंभाचे वेध लागले असून त्याची सुरूवात पुण्यातून होते आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबरला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहं आणि बालगंधर्व इथे प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा सही रे सहीचे प्रयोगही होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Ketaki Chitale on Nana Patekar: 'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
Nana Patekar Death: नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget