Puroshattam Patil in Bigg Boss Marathi season 5 : झाला हरिनामाचा गजर! कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील बिग बॉसच्या घरात
Puroshattam Patil in Bigg Boss Marathi season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात किर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांनी प्रवेश केला आहे.
Puroshattam Patil in Bigg Boss Marathi season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सिझनचा ग्रँड प्रिमिअर पार पडला असून किर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांनी देखील प्रवेश केलाय. पुरुषोत्तम पाटील हे देखील आता बिग बॉसचे स्पर्धक असणार आहेत. त्यामुळे आता खेळात कोणते रंग येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात किर्तनकार शिवलिला पाटील हिने देखील सहभाग घेतला होता. पण अवघ्या काहीच दिवसांत ती घराच्या बाहेर गेली. त्यामुळे आता हे किर्तनकार बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत राहणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान पुरुषोत्तम पाटील कोण आहेत ते जाणून घेऊयात.
पुरुषोत्तम पाटील कोण आहेत?
पुरुषोत्तम पाटील हे किर्तनकार असून ते मागील अनेक वर्षांपासून किर्तनकार म्हणून सेवा करत आहेत. त्यामुळे आता त्यांनी बिग बॉसच्या घरातही एन्ट्री घेतल्याने घरातही किर्तनकारचे रंग दिसणार का? त्यांची अनेक किर्तने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आळंदी, रायगड अशा अनेक ठिकाणी त्यांनी किर्तनं केली आहेत.
वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकरची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
दरम्यान बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, निखिल दामले या स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची एन्ट्रीत होत असल्याचं पाहायला मिळतंय.
प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका
मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अखेर सुरु झाला आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात कशी धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजलं आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस कसा लागेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram