Ankita Walawalkar : अंकिता वालावलकरची गाऱ्हाणं घालत ग्रँड एन्ट्री, कोकण हार्टेड गर्ल निखिल दामलेसोबत बिग बॉसच्या घरात
Ankita Walawalkar : सोशल मिडिया स्टार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही देखील बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे. तिच्यासोबत अभिनेता निखिल दामले देखील घरात सहभागी झाला आहे.
Ankita Walawalkar in Bigg Boss Marathi season 5: कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावरुन पसंतीस उतरलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आता बिग बॉसच्या घरातही (Bigg Boss Marathi Season 5) सहभागी झाली आहे. स्पर्धक म्हणून अंकिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतलीये. तिच्यासोबत अभिनेता निखिल दामले देखील घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही बराच आनंद झालाय. तसेच अंकिताचा खेळ पाहण्यासाठी देखील आता बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता ही प्रसिद्धीझोतात आली. तिचे अनेक फॉलोअर्स सोशल मीडियावर आहेत. अनेक दिवसांपासून अंकिता बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार अशा चर्चा होत्या. त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळाला असून अंकिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.
कोण आहे अंकिता वालावलकर?
कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर कोकणातील बोलीभाषा, तिथलं घर, बाग, निसर्गसौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडीओ बनवत आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. कोकणकन्या (Kokan Hearted Girl) अंकिता प्रभू वालावलकर सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. ती तिचे स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम देखील करते. तसेच ती अनेक कलाकारांसोबत म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. आता ती बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका
मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अखेर सुरु झाला आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजलं आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस कसा लागेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.