Who Is Prajakta Malis Dreamboy: प्राजक्ता माळीचा स्वप्नातला हिरो कसा? भर मंचावर सांगितल्या अटी-शर्ती, म्हणाली...
Who Is Prajakta Mali Dreamboy? झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला प्राजक्ता माळी उपस्थित होती. या सोहळ्यात बोलताना तिनं आपल्या स्वप्नातल्या हिरोबाबत सांगितलं आहे.

Who Is Prajakta Mali Dreamboy: मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) प्राजक्ता माळी (Prajakta Mali) गेल्या काही दिवसांपासून या-ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नाशकातील तिच्या 'शिवार्पणमस्तु' या कार्यक्रमावर घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे प्राजक्ता माळी चर्चेत आली होती. तसेच, सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' (ChikiChiki BooBoomBoom) चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात प्राजक्ता माळी झळकली असून तिच्यासोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट दिसून आली आहे. अशातच नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav 2025) सोहळा पार पडला, या सोहळ्याला प्राजक्ता माळी उपस्थित होती. यावेळी तिनं केलेल्या वक्तव्यामुळे अवघ्या तरुणाईचा काळजाचा ठोका चुकला आहे. प्राजक्ताच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्राजक्ताला ड्रिम हिरो कसा हवाय?
'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' सोहळ्याला प्राजक्ता माळीनं खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्याचा होस्ट असलेल्या अमेय वाघनं प्राजक्ताला तुझ्या स्वप्नातल्या हिरो कसा आहे? तुला काय वाटतं, चहा पिणारा की कॉफी पिणारा?... यावर प्राजक्ता माळी म्हणाली, "चहा पिणारा..." पुढे अमेय वाघ विचारतो, "का...?" तर प्राजक्ता म्हणाली, "मला चहा छान बनवता येतो आणि मला चहा प्यायलाही आवडतो... त्यामुळे घरात तेच बनेल..." त्यानंतर अमेयनं विचारलं, "दाढी की क्लिन शेव्ह...?" प्राजक्ता म्हणाली, त्याला दाढी हवी. तेव्हा अमेय म्हणाला, "का?", त्यावर प्राजक्ता म्हणाली, "छान दिसते... मराठी माणसाला मिशी आणि दाढी पाहिजेच..."
View this post on Instagram
अमेय वाघनं प्राजक्ताला पुढे विचारलं की, "समुद्र किनाऱ्यावर फिरायला घेऊन जाणारा की, डोंगरावर फिरायला घेऊन जाणारा?" प्राजक्ता माळी म्हणाली की, "डोंगरावर...", अमेय वाघ पुढे विचारतो की, "समुद्र किनाऱ्यावर का नाही?" तर प्राजक्ता म्हणाली की, "डोंगरावर प्रेम फुलेलं. समुद्र किनारी जरा उथळ फ्लटिंग होईल." अमेय वाघ पुढे बोलताना म्हणाला की, "म्हणजे जे कोकणात, गोव्यात राहतात ते उथळ फ्लटिंग करतात?" प्राजक्ता लगेच म्हणाली की, "नाही... त्यानं मला डोंगरावर घेऊन जावं मग..."
प्राजक्ताच्या उत्तरावर लगेचच अमेय वाघ म्हणाला की, "ज्याला तुझा हिरो व्हायचं आहे, त्याने फक्त प्रवास करत राहावा, असं तुला म्हणायचं आहे...?" ते ऐकून प्राजक्ता माळी खळखळून हसली आणि म्हणाली की, "नाही... मला घेऊन फिरायला जावं डोंगर माथ्यावर..." शेवटी अमेयनं विचारलं की, "तुझ्यावर कविता करणार की तुझ्या कविता ऐकणारा...? प्राजक्ता म्हणाली की, कविता ऐकणारा. मग अमेय म्हणतो, "मग मला असं वाटतं, जो कोण आहे. ज्याने तुझ्या कविता ऐकल्या पाहिजे, त्याच्यासाठी एक कविता होऊन जाऊ दे..." त्यानंतर प्राजक्ता लगेचच प्रेम म्हणजे प्रेम असतं... ही कविता ऐकवते.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीनं लग्नाला तयार असल्याचं सांगत आईला मुलं बघण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर, प्राजक्ताला दोन मुलांनी पत्राच्या माध्यमातून लग्नाची मागणी घातली होती. यामधील एक पत्र प्राजक्ताला खूप आवडलं होतं. अशातच नुकत्याच पार पडलेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' सोहळ्यात प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाला गौरवण्यात आलं. प्राजक्ताच्या 'फुलवंती'ला तब्बल सहा पुरस्कारांनी गौरवलं गेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























