रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडणारे अभिनव चंद्रचूड आहेत तरी कोण? माजी सरन्यायधीशांची आहे खास नातं!
Who is Abhinav Chandachud : इंडियाज गॉट लेटेन्टमुळे वादात सापडलेल्या रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडणारे अभिनव चंद्रचूड नेमके कोण आहेत? असं विचारलं जातंय.

India's Got Latent And Ranveer Allahbadia : इंडियाज गॉट लेटेन्ट याशोमधुळे कॉमेडियन समय रैना, युट्यूबर रणवीर अलाहाबादिया तसेच कन्टेट क्रिएटर अपूर्वा पाखिजा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात सध्या न्यायालयात खटला चालू आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने या तिघांनाही चांगलंच खडसावलंय. सध्यातरी या तिघांनाही सध्या कोणत्याही शोमध्ये दिसण्यावर बंदी घातली आहे. या तिघांनाही हा खटला लढवण्यासाठी बडे वकील लावले आहे. यातील रणवीर अलाहाबादियाची सध्या विशेष चर्चा होत आहे. कारण त्याची बाजू अभिनव चंद्रचूड हे निष्णात वकील मांडत आहेत.
अलाहाबादियाला देश सोडण्यास मनाई
अॅडव्होकेट अभिनव चंद्रचूड यांनी आज रणवीर अलाहाबादिया याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादियाला पासपोर्ट पोलीस ठाण्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच पूर्वपरवानगीविना त्याला विदेशात जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र तसेच आसाम राज्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्याचाही आदेश दिला आहे.
अलाहाबादियाला कोर्टाने खडसावले
आजच्या सुनावणीत रणवीर अलाहाबादियाला चांगलंच सुनावलं आहे. न्यालयाने अलाहाबादियाच्या वकिलांना उद्देशून तुम्ही अलाहाबादियाने वापरलेल्या भाषेशी समहत आहात का? अश्लिलतेचे काय मापदंड आहेत? बेजबादारीचीही एक सीमा असते. रणवीर अलाबादियाला वाटतं की तो प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे तो काहीही करू शकतो. त्याच्या डोक्यातच घाण भरलेली आहे. न्यायालयाने अशा माणसाची बाजू का घ्यावी? रणवीर अलाहाबादिया संपूर्ण समाजाला हलक्यात घेतोय का? त्याची भाषा आवडणारा, या धरतीवर एक तरी माणूस असेल का? अशा शब्दांत न्यायालयाने अलाहाबादियाची खरडपट्टी काढली.
अभिनव चंद्रचूड कोण आहेत?
दरम्यान, हा खटला जिंकण्यासाठी रणवीर अलाहाबादियाने प्रसिद्ध आणि निष्णात वकील अभिनव चंद्रचूड यांना नियुक्त केलंय. अभिनव चंद्रचूड हे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. त्यांनी मुबंईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबी आणि बीएलएसचे शिक्षण घेतलेले आहे. हार्वर्ड लॉ स्कुलमध्ये 2009 साली त्यांना दाना स्कॉलर म्हणून सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी हार्वर्ड येथून एलएलएमचे शिक्षण घेतलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते विकिली करतात.
हेही वाचा :
छावा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अवघ्या 4 दिवसांत कमावले 140 कोटी!
























