Tula Japnar Aahe Marathi Serial Track: मालिकेत फोटोला घातला हार, अभिनेत्रीचं टेन्शन वाढलं, घरातल्यांना काय वाटेल? विचारानंच धास्तावली
Tula Japnar Aahe Marathi Serial Track: अंबिका हयात नसतानाही आपल्या मुलीच्या रक्षणासाठी ती परत आली आहे. अंबिकाचा भूतकाळ असा आहे की, ती एका अनाथाश्रमात वाढली आहे.

Tula Japnar Aahe Marathi Serial Track: झी मराठीवर (Zee Marathi) 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe) या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर (Pratiksha Shivankar), अंबिकाची भूमिका साकारत आहे. प्रतीक्षानं आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींवर चर्चा केली. 'तुला जपणार आहे' मालिकेत अंबिकाच्या भूमिकेतून मी तुम्हा सर्वांसमोर एका नव्या रूपात भेटीस येणार आहे. जसं तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलं आहे.
अंबिका हयात नसतानाही आपल्या मुलीच्या रक्षणासाठी ती परत आली आहे. अंबिकाचा भूतकाळ असा आहे की, ती एका अनाथाश्रमात वाढली आहे. पुढे जाऊन तिचं एका मोठ्या घराण्यात लग्न होतं, तिचा सुखाचा संसार सुरू होतो. पण तिच्या सुखी संसाराला कोणाचीतरी नजर लागते, तिच्यासोबत एक दुर्घटना घडते आणि ती जगातून निघून जाते. अंबिकाला सतत आपल्या मुलीची चिंता आहे की, तिच्यावर काही संकट आहे. ही गोष्ट एका आईच्या मातृत्वाची आणि तिच्या मुलीच्या प्रेमाची आणि रक्षणाची आहे. ही मालिका इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे, असं प्रतीक्षा शिवणकर म्हणाली.
माझ्यासाठी एक कलाकार म्हणून ही भूमिका आव्हानात्मक आहे कारण जेव्हा आपण भूताची भूमिका करत असतो तेव्हा आपल्या शरीरातून कोणी येत-जात आहे ते निभावणं आणि शूट करण्याची पद्धतही वेगळी आहे, तेव्हा मज्जा ही येत आहे. खूप काही शिकायला मिळत आहे. अंबिकाच्या भूमिकेसाठी माझी रीतसर ऑडिशन झाली. अंबिकाच्या भूमिकेसाठी मला आयरिस प्रॉडक्शन मधून कॉल आला, मी दिलेली ऑडिशन प्रॉडक्शन आणि चॅनेलनं पहिली त्यांना ती आवडली आणि माझं सिलेक्शन झालं. झी मराठी सोबत माझी ही पहिलीच मालिका आहे. एक चांगलं प्रॉडक्शन आणि चांगल्या वाहिनी सोबत काम करायला मिळणं याचा मला आनंद आहे. जितका आनंद मला झाला तेवढाच आनंद माझ्या घरच्यांना देखील झाला. मलाच थोडं टेंशन आले होते की घरचे कसे रिऍक्ट होतील, कारण अंबिकाच पात्र मालिकेत मरणार आहे आणि तिच्या फोटोला हार घातला जाणार आहे. पण जेव्हा त्यांनी प्रोमो पाहिला ते ओके होते. उलट घरातल्यानीच मला समजावलं. प्रोमो पाहून सगळ्यांनी प्रचंड छान रिस्पॉन्स दिला आहे. आता जबाबदारी वाढली आहे, अजून छान काम करायचं आहे, असं प्रतीक्षा शिवणकर म्हणाली.
आमची टीम अप्रतिम आहे. पूर्णिमा तळवलकर, शर्वरी लोहोकरे, मिलिंद फाटक यांसारखे जेष्ठ कलाकार मालिकेत असणार आहेत. पण पहिल्या दिवसापासूनच ते इतके कूल होते आमच्याशी की कधी दडपण आलं नाही आणि आम्हाला पण जराही वाटल नाही की आम्ही इतक्या सिनीअर आर्टिस्ट सोबत आहोत. तुम्ही मालिका मध्ये ती सहजता दिसेल. आमची छान भट्टी जमली आहे. अंबिका एक भूत आहे तिचा लुक सिम्पल आहे. आमची जी कॉस्ट्यूम डिजायनार आहे संपदा महाडिक तिला माहिती आहे कि अंबिकाचे कसे सीन्स असतील काय स्टंट्स होणार या प्रमाणे अंबिकाच लुक डिजाईन केला गेला आहे. मला वाटत अंबिकाचा भूताचा जो लुक आहे सिम्प्ल साडी वाला तो ट्रेंड मध्ये येऊ शकतो. माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात प्रशांत दामले, कविता लाड यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकातून झाली. ते माझं पाहिलं काम होत. त्यानंतर दोन मालिका केल्या आता ही माझी तिसरी मालिका आहे. त्या आधी प्रशांत दामले यांच्या टी-स्कुलला मध्ये होते तिथून मी कलाकार म्हणून घडत गेले.
























