एक्स्प्लोर

Vishal Kotiyan : 'इथं राहायचं असेल तर..' बिग बॉसमधून येताच विशाल कोटियन रिक्षा- टॅक्सी चालकांच्या संपावरून भडकला, म्हणाला...

Vishal Kotiyan On Riksha Taxi Marathi Compulsion: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विशाल कोटियन (Vishal kotian) यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Kotiyan on Rikshaw Taxi Marathi Compulsory: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे चांगलाच वाद उफाळून आला आहे.(Marathi compulsion for Auto Taxi) परवानाधारक सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्यानंतर या नियमा विरोधात महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्स चालकांनी 4 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. या प्रकरणावर सर्व स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत .मराठी कलाविश्वातून अनेक अभिनेत्यांनी  रिक्षा - टॅक्सी चालकांच्या संपावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विशाल कोटियन (Vishal kotian) यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात टॉप 5 स्पर्धकांमध्ये गेलेला अभिनेता विशाल कोटीयन याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. बिग बॉस मराठी संपल्यानंता तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या रिक्षा चालकांवरील मराठी भाषा सक्तीवर तो बोललाय.

काय म्हणाला विशाल कोटियन ?

विशाल म्हणाला ' माझा जन्म महाराष्ट्रात झालाय. मी जन्माने कर्माने आणि मनानेही मराठी आहे. या आधी मी काही मराठी नाटकांमध्ये काम केलंय. मध्ये कुठेतरी हिंदीत काम करत असताना मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉसमुळे मला स्पष्ट मराठी बोलता येतंय. मराठी एक चांगली भाषा आहे. मला मराठी आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे याच मताचा मी आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये ही असंच आहे. महाराष्ट्रात राहूनही तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. मी आत्ता बिग बॉस मधून बाहेर आलोय त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण, हा निर्णय योग्य आहे . मराठी यायलाच पाहिजे. मराठी बोला कारण हा महाराष्ट्र आहे. " असं विशाल म्हणाला.

नेमकं प्रकरण काय?

परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मेपासून मराठी भाषा जाणणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या तसेच भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्यात येणार आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget