एक्स्प्लोर

Ambarnath Theatre: विशाखा सुभेदारच्या नाटकात शेकडो प्रेक्षकांसमोर नाट्यगृहाची नाचक्की; अर्धा तास नाट्यप्रयोग ठप्प, कारण काय?

नाटकाचा प्रयोग संपल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. या प्रकारामुळे अंबरनाथ पालिकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

Ambarnath: मराठी कलाकार नाट्यगृहांच्या स्वच्छतेवरून, व्यवस्थेवरून कायम सजग असल्याचं दिसतं. मात्र, अनेकदा भर प्रयोगात काहीतरी अडचणी, अनुभव येतात ज्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतो. असंचं काहीसं अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी घडलं. अंबरनाथमध्ये  नाट्यप्रयोगादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या ‘दमयंती दामले’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडेनासा झाला. त्यामुळे सुमारे अर्धा तास नाट्यप्रयोग ठप्प राहिला आणि प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

एकही टेक्निशियन नव्हता, आयोजनावर प्रश्नचिन्ह

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यंतरानंतर प्रयोग पुन्हा सुरू करण्यासाठी कलाकार तयार होते, मात्र पडदा उघडण्यासाठी आवश्यक यंत्रणा काम करत नव्हती. विशेष म्हणजे, त्या वेळी नाट्यगृहात एकही टेक्निशियन उपस्थित नव्हता. परिणामी कलाकारांनाच पुढाकार घेत हाताने पडदा उघडावा लागला आणि त्यानंतर नाट्यप्रयोग पुन्हा सुरू करण्यात आला. या घटनेपूर्वीच नाटकाच्या साउंड सिस्टीममध्येही बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नाटकाच्या साउंड टीमने तत्परता दाखवत तो प्रश्न सोडवला आणि प्रयोग सुरू ठेवला. तरीही, पडद्याच्या बिघाडामुळे संपूर्ण आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

प्रेक्षकांची नाराजी 

नाटकाचा प्रयोग संपल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतः पुढाकार घेत हातानेच पडदा बंद केला. या घटनेमुळे उपस्थित नाट्यरसिक आणि आयोजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आयोजक आप्पा कुलकर्णी यांनीही याबाबत संताप व्यक्त करत, इतक्या मोठ्या नाट्यगृहात मूलभूत सोयीसुविधा आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. “नाटक सुरू असताना अशी अडचण येणं अत्यंत लाजिरवाणं आहे,” असे ते म्हणाले. या प्रकारामुळे अंबरनाथ पालिकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कलाकार आणि शेकडो प्रेक्षकांसमोर पालिकेची नाचक्की झाली. दरम्यान, नाटक संपल्यानंतर आलेल्या टेक्निशियनने पडद्याचा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget