Viral Girl Monalisa 10 Crore Earning: सोनेरी डोळ्यांच्या मोनालिसानं महाकुंभमध्ये माळा विकून 10 दिवसांत 10 कोटी कमावले? Video Viral
Viral Girl Monalisa 10 Crore Earning: काही दिवसांपासून असं बोललं जात आहे की, अशी अफवा पसरली होती की, मोनालिसा नावाच्या या मुलीनं रुद्राक्षांच्या माळा विकून फक्त 10 दिवसांत 10 कोटी रुपये कमावले आहेत.
Viral Girl Monalisa 10 Crore Earning: सध्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभ (Maha Kumbh) मेळ्याची जगभरात जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. देश-विदेशातून अनेक संत-महात्मे महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये एकवटले आहेत. अनेकजण तर सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आहेत. त्यांच्या वेगळेपणामुळे अनेकजण व्हायरल झाले आहेत. दरम्यान, महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी सोनेरी डोळ्यांची मुलगी एक मुलगी व्हायरल होत आहे. या मुलीनं सर्व देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. ती सोनेरी डोळ्यांची मुलगी म्हणजे, मोनालिसा. तिचे सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपासून असं बोललं जात आहे की, अशी अफवा पसरली होती की, मोनालिसा नावाच्या या मुलीनं रुद्राक्षांच्या माळा विकून फक्त 10 दिवसांत 10 कोटी रुपये कमावले आहेत. अशातच, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मुलगी फक्त 10 दिवसांत 10 कोटी रुपये कसे कमावू शकते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
याबाबतचा मोनालिसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे आणि यामध्ये ती तिच्या कमाईबाबत सत्य सांगताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मोनालिसासोबत रुद्राक्षाच्या माळा विकणारी तिची मैत्रीण सांगत आहे की, कोणीतरी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, तिनं हार विकून 10 दिवसांत 10 कोटी रुपये कमावले आहेत.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये मोनालिसा आम्हाला काहीही सापडलेलं नाही, असं म्हणत असल्याचे दिसत आहे. लोक म्हणतात की, आम्ही 10दिवसांत 10 कोटी रुपये कमावले आहेत. जर आम्ही एवढे पैसे कमावले असते, तर आम्ही इथे येऊन का राहिलो असतो? इथे माळा कशाला विकल्या असत्या? यावर रिपोर्टरने मोनालिसाला विचारले, तू इथे राहतेस का आणि हा तुझा कॅम्प आहे का? यावर मोनालिसानं हो, असं उत्तर दिलं.