Break up Song : #BreakUpAnthemOfTheYear 'चांगली खेळलीस तू' प्रेक्षकांच्या भेटीला!
Break up Song : विनय प्रतापराव देशमुख आणि रुचिरा जाधव या जोडीचं #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
![Break up Song : #BreakUpAnthemOfTheYear 'चांगली खेळलीस तू' प्रेक्षकांच्या भेटीला! Vinay Deshmukh And Ruchira Jadhav starrer Break up song Changli khelalis tu release Break up Song : #BreakUpAnthemOfTheYear 'चांगली खेळलीस तू' प्रेक्षकांच्या भेटीला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/12/f5eeeaf5d59ab0ae029a4b649d547f77_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Break up Song : "प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं", असं अनेकजण म्हणायचे. पण, खरंच सगळ्यांचं प्रेम सेम असतं का? जर प्रेम सेम असेल, तर ब्रेकअप पण सेम असतं का? मनापासून जोडलेलं नातं जेव्हा तुटतं किंवा ब्रेकअप होतं, तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल... ती व्यक्ती मनाने किती खचून गेली असेल... असंच काहीसं झालंय अभिनेता विनय प्रतापराव देशमुख याच्यासोबत आणि म्हणूनच तो बोलतोय "चांगली खेळलीस तू... भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू...!"
‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’, ‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने विनय प्रतापराव देशमुख आणि रुचिरा जाधव या जोडीचं #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. मयंक पुष्पम सिंह निर्मित हे मराठी ब्रेकअप रॅप साँग नुकतेच पुणे येथे लाँच करण्यात आले. याप्रसंगी गाण्यातील प्रमुख कलाकार विनय प्रतापराव देशमुख, रुचिरा जाधव, रॅपर सर्जा, 'मीडियावर्क्स स्टुडिओ'चे डायरेक्टर श्री. सुजित शिंदे , पार्श्वगायक तसेच 'मीडियावर्क्स स्टुडिओ'चे डायरेक्टर मंगेश बोरगावकर, 'मीडियावर्क्स स्टुडिओ'चे फाउंडर डायरेक्टर आदित्य विकासराव देशमुख, 'रिफिल'चे डायरेक्टर सुरेश तळेकर आणि सुनील चांदुरकर उपस्थित होते.
गेले दोन वर्ष लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे मनोरंजन क्षेत्राशी निगडीत गोष्टींना जरा ब्रेक लागला होता. लॉकडाऊनच्या पूर्वी सिनेमा, संगीत यांचा प्रकाशनसोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला जायचा. सुरक्षिततेच्या दृष्टिने नंतर प्रोजेक्ट डिजीटली लाँच केले गेले, पण आता सर्वकाही सुरळित होण्याच्या मार्गावर आहे या आनंदाने ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप साँग हक्कांच्या माणसांच्या उपस्थितीत ऑफलाईन पध्दतीने लाँच करण्यात आले.
गाण्याचा हिरो आणि हिरोईन यांच्यातील सीन्स, रॅप साँगचे शब्द, एकंदरीत संपूर्ण गाणं पाहता ते प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास वाटतो. दुःख आलं की, ते कुरवाळत बसायचं की, त्यातून स्वतःला घडवायचं हे तुम्हाला या गाण्याचा शेवट पाहिल्यावर कळेल. या गाण्यात प्रेक्षकांसाठी एक सुंदर, गोड सरप्राईज पण आहे आणि ते सरप्राईज म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. सायली संजीव या गाण्यात 'सायली संजीव'च्याच भूमिकेत दिसणार आहे. आता गाण्यात सायलीची एन्ट्री नेमकी कशी होते, हा एक ट्विस्ट आहे जो गाणं पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल.
तसेच या गाण्यात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीवर देखील नजर टाकण्यात आली आहे जी खरंतर वस्तुस्थिती आहे आणि ती व्यक्ती आहे आपली आई. ब्रेकअप झाल्यावर आईचं महत्त्व समजतं, तिच्या कुशीत जाऊन मनमोकळं रडावंसं वाटतं, आईसाठीच्या भावना या गाण्यात दाखवल्या आहेत. एकंदरीत हे गाणं इमोशन्सने भरलेलं आहे. गाण्याच्या टीमने गाण्याच्या मार्फातून दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही प्रेक्षकांना पटली आहे. याचा पुरावा म्हणजे फक्त दोन दिवसांत या गाण्याला 2 लाखांहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत.
अभिनयासह विनय प्रतापराव देशमुखने या गाण्याचं दिग्दर्शन देखील केले आहे. हे रॅप साँग रॅपर सर्जा याने गायले असून या गाण्याचे शब्द ही त्यानेच लिहिले आहेत. शांप्रद भम्रे यांनी गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. सुमेध कंकाळ हे गाण्याचे असोशिएट डायरेक्टर आहेत तर निखिल गुल्हाने हे डिओपी आहेत. ‘रिफील मिडीया’ हे या गाण्याचे ऑफिशिअल डिस्ट्रीब्युटर पार्टनर आहेत आणि हे गाणं ‘रिफील मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : ‘ना चलेगी भाईगिरी, ना पापा का पैसा’, कंगनाच्या नव्या शोचा धमाकेदार टीझर पाहिलात?
- Vishal Nikam : औक्षण,आशिर्वाद,आपलेपणा! ‘बिग बॉस मराठी 3’ विजेता विशाल निकमने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस
- Kangana Ranaut On Hijab Row : ‘हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात...’, कर्नाटक हिजाब प्रकरणावर संतापली कंगना!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)