Vijay Mallya : दिग्गज अभिनेत्रीचं केलं होतं कन्यादान, देशातून पळ काढणाऱ्या विजय मल्ल्याचं बॉलिवूडमध्ये मोठं कनेक्शन
Vijay Mallya : देशातून पळ काढणाऱ्या विजय मल्ल्याचं बॉलिवूडमध्ये मोठं कनेक्शन, दिग्गज अभिनेत्रीचं केलं होतं कन्यादान

Vijay Mallya : भारतातील बँकांमधून कर्ज काढून देशातून पळ काढणारा विजय मल्ल्या (Vijay Mallya) गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. कारण त्याचा रॉयल चॅलेंजर्स या संघाने आयपीएलच्या ट्रॉफीवर पहिल्यांदा नाव कोरलंय. दरम्यान, आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर विजय मल्ल्याने (Vijay Mallya) एक मुलाखत दिलीये. ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीये. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याविषयी मोकळेपणाने भाष्य केलंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की विजय माल्या (Vijay Mallya) हे बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे नातेवाईक असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने गुपचूप विवाह उरकलेला असताना विजय मल्ल्याने तिचं कन्यादान केलं होतं.
विजय मल्ल्याने कन्यादान केलेली ही अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. समीरा हिने 'आक्रोश', 'तेज', 'दे दना दन', 'मैंने दिल तुझको दिया' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये ‘डीएनए’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने उघड केलं की, तिच्या लग्नात विजय मल्ल्यांनी कन्यादान केलं होतं. ते तिच्या आईकडील एकमेव नातेवाईक होते, जे त्या विवाह समारंभाला उपस्थित होते.

समीरा रेड्डीच्या लग्नात विजय मल्ल्यांकडून कन्यादान
समीरा म्हणाली होती, "फक्त विजय मल्ल्या, जे माझ्या आईच्या बाजूने नातेवाईक आहेत, त्यांनीच माझं कन्यादान केलं. याशिवाय लग्नात फक्त मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते." विजय माल्या आणि समीरा रेड्डी यांच्यात थेट रक्ताचं नातं नाही, पण ते समीरा रेड्डीच्या आईच्या बाजूने संबंधित आहेत. ही गोष्ट समीरा रेड्डीच्या लग्नानंतर प्रथमच समोर आली होती. समीरा हिने आपल्या सीक्रेट वेडिंगबद्दल कोणालाही कल्पनाही लागू दिली नव्हती.
View this post on Instagram
लग्नानंतर अभिनय विश्वातून घेतली एक्झिट
सोहेल खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीने 2014 मध्ये उद्योजक अक्षय वर्दे यांच्यासोबत गुपचूप लग्न केलं. इंडस्ट्रीमधील कोणालाही या लग्नाची कल्पना नव्हती. लग्नानंतर समीरा हिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस वर्ल्डला कायमचा रामराम ठोकला आणि गोव्यात आपल्या कुटुंबासह स्थायिक झाली. सध्या ती पती अक्षय वर्दे आणि दोन मुलांसोबत गोव्यात राहते.
सलमान खानच्या भावासोबत केलं होतं डेब्यू
समीरा रेड्डीने 2002 मध्ये ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात सोहेल खान आणि संजय दत्त यांच्या सोबत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर 'मुसाफिर', 'टॅक्सी नंबर 9211', 'रेस', 'दे दना दन', आणि 'तेज' यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली वेगळी छाप पाडली. अभिनय क्षेत्रापासून दूर गेल्यावरही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आईपण आणि महिलांचा फिटनेस याविषयी ती सतत पोस्ट्स आणि रील्स शेअर करत असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या























