(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Natkhat | विद्या बालनचा 'नटखट'ऑस्करवारीला
कोरोना महामारीच्या काळात नटखट जगातील अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.
मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा 'नटखट' या लघुपटाला आता ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री मिळाली आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी भारताकडून ‘नटखट’ची निवड करण्यात आली आहे. सर्वश्रेष्ठ लघु चित्रपट (लाईव्ह सेक्शन) साठी ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. रॉनी स्क्रूवाला आणि विद्या बालन निर्मित हा लघुपट आहे. शान व्यास यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. नटखट ही 33 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म आहे.
कोरोना महामारीच्या काळात नटखट जगातील अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. ट्रिबेका येथील अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (2 जून 2020) मध्ये याचा वर्ल्ड प्रीमियर करण्यात आला होता. त्यानंतर इंडियन फिल्म फेस्टिवल स्टटगार्ट (15-20 जुलै, 2020) मध्ये याचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. या शॉर्ट फिल्मला जर्मन स्टार ऑफ इंडिया अॅवार्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
#Natkhat is in the race for the #Oscars2021! Here is a snippet from our special film.@mesopystic @RonnieScrewvala @SanayaIZohrabi @RSVPMovies @FontOfThinking pic.twitter.com/j68MNujirq
— vidya balan (@vidya_balan) February 4, 2021
नटखट या लघुपटाला लंडन आणि बर्मिघममध्ये लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल (17-20 सप्टेंबर 2020),साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हल - ऑरलैंडो/फ्लोरिडा फिल्म फेस्टिव्हल (10-11 ऑक्टोबर 2020 ) साठी आमंत्रित करण्यात आले होते. मेलबर्नमधील इंडियन फिल्म फेस्टिव्हलची (16-23 ऑक्टोबर 2020) सुरूवात या फिल्मने झाली होती.
बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये (7 नोव्हेंबर 2020) 'नटखट' गौरविण्यात आले होते. त्यानंतर २०२१ सालच्या ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले होते.