Vidya Balan : 'त्यानं मला कुरूप असल्याची जाणीव करून दिली अन् मी.....'; विद्यानं सांगितला अनुभव
Vidya Balan :एका मुलाखतीमध्ये विद्यानं चित्रपट निर्मात्यांनी तिच्या दिसण्यावरून केलेल्या कमेंटबद्दल सांगितलं आहे.
![Vidya Balan : 'त्यानं मला कुरूप असल्याची जाणीव करून दिली अन् मी.....'; विद्यानं सांगितला अनुभव vidya balan say about a producer made her feel ugly she walk from Marine Drive to Bandra Vidya Balan : 'त्यानं मला कुरूप असल्याची जाणीव करून दिली अन् मी.....'; विद्यानं सांगितला अनुभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/55d968639a0644936ed4cfc245f0bff7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vidya Balan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन(Vidya Balan)चा जलसा (Jalsa) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं विद्या सध्या प्रमोशन करत आहे. विद्यासोबतच अभिनेत्री शेफाली शाहा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये विद्यानं चित्रपट निर्मात्यांनी तिच्या दिसण्यावरून केलेल्या कमेंटबद्दल सांगितलं आहे.
एका मुलाखतीमध्ये विद्यानं सांगितलं, 'काही दिवसांपूर्वी एका चित्रपट निर्मात्याचा फोन मला आला. ज्यांनी मला त्यांच्या चित्रपटामधून काढून टाकलं होते. ' त्या चित्रपट निर्मात्यांनी विद्याला 13 चित्रपटांमधून काढलेलं असंही तिनं सांगितलं.
पुढे विद्या म्हणाली, 'त्या निर्मात्यानं मी कुरूप आहे, अशी जाणीव मला करून दिली होती. त्याच्या या कमेंटमुळे पुढील सहा महिने आरशामध्ये चेहरा बघायची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. या घटनेनंतर मी खूप चिडले होते. तेव्हा उन्हाळा सुरू होता. उन्हामध्ये मी मरीन ड्राइव्हपासून वांद्र्यापर्यंत चालत गेले. काही तासानंतर माझ्या लक्षात आलं की मी एवढ्या लांब चालत आले, '
View this post on Instagram
विद्याचा जलसा हा चित्रपट 18 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. विद्यासोबतच या चित्रपटात शेफाली शाह, रोहिणी हट्टंगडी, इकबाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत यादव, शफीन पटेल आणि सूर्या कसीभटला हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या
- The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!
- The Kashmir Files Box Office Collection Day 4: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)