Vivek lagoo Passes Away: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन; रंगभूमीसाठी झटणारा नट हरपला
Vivek lagoo Passes Away: अभिनेते विवेक लागू यांनी गुरुवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव.

Vivek lagoo Passes Away: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Vivek lagoo) यांचं निधन झालंय. मुंबईच्या (Mumbai News) अंधेरीतील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीमध्ये उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विवेक लागू हे ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांचे पूर्वाश्रमीचे पती होते, तर अभिनेत्री लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये विवेक लागू यांनी काम केलंय. 'व्हॉट अबाऊट सावरकर', 'अग्ली', '31 दिवस' या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय 'चार दिवस सासूचे' , 'हे मन बावरे' या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलंय.
अभिनेते विवेक लागू यांनी (20 जून 2025) गुरुवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव होतं. विवेकच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम विकी लालवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. विवेक लागू यांचे अंत्यसंस्कार आज, (शुक्रवार, 20 जून 2025) ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील.
विवेक लागू (Vivek lagoo) यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. चल आटप लवकर, प्रकरण दुसरं, सर्वस्वी तुझीच या गाजलेल्या नाटकांचं लेखन विवेक लागू यांनी केलं.
विवेक लागू (Vivek lagoo) यांना संगीतातही त्यांची रुची होती. मात्र, अपघातानंच ते अभिनयाकडे वळले. विजय मेहता यांच्या शिबिरात येण्याची त्यांना संधी मिळाली होती. मात्र त्या शिबिरात केवळ अभिनयाचेच धडे देणार होत्या. मुंबईत 1 महिना फुकट राहता येणार होतं म्हणून त्यांनी शिबीर जॉइन केलं आणि अभिनय शिकले. दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांनी अभिनयही चांगला केला. इतकंच नाही तर अभिनयातही त्यांनी पुरस्कार मिळवले.
9 वर्षांपूर्वी Reema Lagoo यांनी घेतला जगाचा निरोप
विवेक लागू (Vivek lagoo) आणि रीमा लागू (Reema Lagoo) यांचं लग्न 1978 मध्ये झालेलं, पण काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. रीमा लागू आणि विवेक यांना एक मुलगी देखील आहे, तिचं नाव मृण्मयी लागू. रीमा लागू यांनी त्यांच्या मुलीचं एकट्यानं पालनपोषण केलं. मृण्मयी लागू प्रसिद्ध लेखिका आहे. तिने 'थप्पड', 'स्कुप' सारख्या चित्रपटांचं लेखन केलं आहे. 2017 मध्ये अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रीमा लागू बहुतेकदा बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारताना दिसल्या. 'हम आपके हैं कौन' पासून 'हम साथ साथ हैं' पर्यंतच्या चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली.























