Vanita Kharat : 'एका तासाची सोय होईल का? प्रश्न ऐकून मी थंड पडले', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने सांगितला आयुष्यात तो भयानक किस्सा
Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरात ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या चित्रपटातून घराघरात पोहचली आहे. वनिताने तिच्या आयुष्यातील एक भयाकन किस्सा एका मुलाखतीमध्ये शेअर केला आहे.
Vanita Kharat : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून वनिता खरात (Vanita Kharat) ही घरोघरी पोहचली. तिच्या विनोदांनी आणि अभिनयाने वनिताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तसेच वनिताने मोठ्या पडद्यावरही तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. वनिता ही अनेकदा सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी वनिता तिच्या न्यूड फोटोशूटमुळेही चर्चेत आली होती. पण सध्या वनिताच्या आयुष्यातील एका भयानक किस्सा सांगितला आहे. त्यानंतर तिची काय अवस्था झाली होती, यावर देखील वनिताने भाष्य केलं आहे.
वनिता खरातने आसोवा या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातला हा प्रसंग सांगितला. अभिनेत्रींच्या बाबतीत अनेकदा अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या असल्याचं समोर येतं. अभिनेत्री स्वत: त्यांच्या आयुष्यातले हे किस्से सांगत असतात. त्यावेळी होणार अवस्था ही देखील अनेकदा मन हेलावून टाकणारी असते. असाच एक किस्सा वनिताच्या आयुष्यात घडला. दोन व्यक्तींनी तिला विचारलं होतं की एका तासाची वैगरे सोय होईल का? या प्रश्नावर मी थंड पडले होते, असा अनुभव वनिताने सांगितला.
वनिताने काय म्हटलं?
मी त्या दिवशी रात्री दादरला मैत्रीणीला सोडायला गेले होते. तेव्हा तिथेच एका कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि ती वॉशरुमला गेली. तेव्हा तिथे दोन पुरुष आले आणि त्यांनी मला विचारलं की नाशिकला जाण्यासाठी गाडी कुठे मिळेल. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही प्लॅटफॉर्मला जाऊन विचारा. तेव्हा त्यांनी मला विचारलं की बस वैगरे काही आहे का, त्यावर मी त्यांना सांगितलं की तिथे जवळ एसटी स्टॅण्ड पण आहे, तुम्ही त्यांना जाऊन विचारा.त्यानंतर दोन मिनिटं ते लोकं तिथेच घुटमळत होते आणि थेट मला त्यांनी प्रश्न विचारला की इथे अशी काही सोय आहे का? एका तासाची सोय होईल का? मी तो प्रश्न ऐकून थंड पडले होते. मी अशी मुलगी आहे की कोणी मला अरे केलं की त्याला थेट खानाखाली पडेल. पण तेव्हा मी काहीच करु शकले नाही, असं वनिताने सांगितलं.
तेव्हा मला काहीच करता आलं नाही - वनिता खरात
त्यांनी मला हा प्रश्न विचारल्यानंतर मी सुरुवातीला काहीच करु शकले नाही. त्यानंतर माझ्या मैत्रीणीला त्यांनी तिथे येताना पाहिलं. तेव्हा तिथून ते पसार झाले. माझी मैत्रीण जेव्हा आली तेव्हा आम्ही त्यांना पाहायला गेलो, पण ते पळून गेले होते. पण त्यावेळी मी काहीच करु शकले नाही, असा प्रश्न मला पडला आणि हे माझ्याच बाबतीत का झालं हा प्रश्न त्यांनी मलाच का विचारला असंही माझं तेव्हा झालं. तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट किस्सा आहे, असा अनुभव वनिता खरातने शेअर केला.