Ketaki Chitale On Uran Case : ना पोलीस...ना प्रशासन...आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे; केतकी चितळेचा यशश्री प्रकरणावर संताप
Ketaki Chitale On Uran Murder Case : यशश्री शिंदे प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला असून आता आपल्याला धर्मासाठी लढायचे असून पोलीस आपल्या बाजूने नसल्याचे वक्तव्य केतकी चितळेने व्यक्त केले आहे.
अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या सामाजिक-राजकीय मुद्यांवर घेत असलेल्या भूमिकेमुळे कायम चर्चेत असते. नवी मुंबईतील यशश्री शिंदेच्या प्रकरणावर केतकीने एक नवा व्हिडीओ रिलीज केला आहे.
केतकीने आपल्या व्हिडीओत काय म्हटले?
लव्ह जिहाद फक्त बिहारमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त केरळमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होतोय हे खोटं आहे.
लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडताय, हे खोटं आहे. जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद आहे.
आपल्याला आता धर्मासाठी लढायचे आहे, पोलीस आपल्या बाजूने नाही, प्रशासन आपल्या बाजूने नाही.
आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे... असे केतकीने म्हटले.
आपल्या मुली गायब होतायत. कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात ,तर कधी समुद्रात. नाही तर सुटकेसमध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे असे केतकीने आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.
View this post on Instagram
उरण पीडितेला न्याय कधी मिळणार? हत्येच्या तीन दिवसानंतरही आरोपीचा ठावठिकाणा लागेना
रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उरणमधल्या सातरहाठी गावात राहणारी तरुणी 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. शनिवारी उरणमधल्या एका पेट्रोल पंपाच्या मागील मैदानावरच्या झुडूपामध्ये त्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. शरीरावर वार करुन तिची निर्घृण हत्या करण्य़ात आल्याचं स्पष्ट झाले आहे. या तरूणीची हत्या होऊन तीन दिवस झाले तरी अजून पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे संतापलेल्या उरणमधल्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांना दाऊद शेख नावाच्या तरुणावर संशय असून तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक बेंगळुरू येथे गेले आहे.