Soham Bandekar Pooja Birari Buys New Home: आदेश बांदेकरांचा लेक अन् सून लग्नानंतर लगेच वेगळा संसार थाटणार? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
Soham Bandekar Pooja Birari Buys New Home: आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि सून पूजा बिरारी यांनी दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Soham Bandekar Pooja Birari Buys New Home: मराठी अभिनेत्री (Marathi Actress) पूजा बिरारी (Pooja Birari) आणि अभिनेता सोहम बांदेकर (Soham Bandekar) यांचा शाही रिसेप्शन सोहळा (Pooja Birari Soham Bandekar Reception Function) नुकताच पार पडला. सोहम आणि पूजाच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले. अशातच आता दोघांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता लग्नानंतर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा लेक आणि सून दोघेही वेगळे राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि सून पूजा बिरारी यांनी दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सोहम आणि पूजा दोघे दिसत असून पूजाच्या हातात घराची चावी दिसतेय. त्यामुळे दोघेही वेगळे राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, सोहम आणि पूजानं हे घर नवीन घेतलेलं नाही, तर ते या घरात भाड्यानं राहणार आहेत. शूटिंग लोकेशन जवळ असल्यामुळे त्या दोघांनी या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. पण, यामुळे ते लग्नानंतर लगेचच वेगळा संसार थाटणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, सोहमची आई, प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनीही यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना लग्नानंतर सोहमनं वेगळं राहण्याबाबत भाष्य केलेलं.
View this post on Instagram
लेकाचा वेगळा संसार थाटण्याबाबत सुचित्रा बांदेकर काय म्हणालेल्या?
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या होत्या की "आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की, लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा... तुम्हाला काही लागलं तर मी आहे. मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे... मी सोहमला सांगितलंय की, लग्नानंतर वेगळं घर शोधा... वेगळ्या घरी मस्त मजेत राहा. आईबाबा आहेतच... तिचंही माहेर आहे. त्यामुळे तिचेही आईबाबा आहेत. एकत्र राहून रोज कचकच करायचं... मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे. आता तुम्ही तुमचं करा..."
सुचित्रा बांदेकरांच्या याच वक्तव्यामुळे त्यांचा लेक सोहम बांदेकर आणि सून पूजा बिरारी दोघेही वेगळे राहणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच त्यांचा व्हायरल झालेल्या फोटोमुळे जोरदार चर्चाही सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























