एक्स्प्लोर

Tula Japnar Aahe Marathi Serial Track: 'तुला जपणार आहे' झी मराठीवरची नवी मालिका; मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

Tula Japnar Aahe Marathi Serial Track: 'तुला जपणार आहे' या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे (Sharvari Lohokare) पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत.

Tula Japnar Aahe Marathi Serial Track: झी मराठीनं (Zee Marathi) मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe) मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्तानं, झी मराठीनं उपस्थित पत्रकारांसोबत एका रोमांचक कथाकथनाचा अनुभव घेण्यासाठी अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर केला. हा लॉन्च इव्हेंट खरोखरच उपस्थितांसाठी वेगळा ठरला. 

'तुला जपणार आहे' या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे (Sharvari Lohokare) पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. तसेच, या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर, अमोल बावडेकर ह्या तंगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 

'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची! अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलय. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे परंतु आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे व तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट या सगळ्याचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं, जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते. तसंच  अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते. या दोघींच्या या नात्यामागचं  गूढ असेल तरी काय ? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार हे पाहण्यासारखे असेल. 


Tula Japnar Aahe Marathi Serial Track: 'तुला जपणार आहे' झी मराठीवरची नवी मालिका; मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

तुला जपणार आहे या हॉरर, थ्रिलर आणि फॅमेली ड्रमा असणाऱ्या या मालिकेतील प्रसंग आणि घटना larger than life असणार आहेत. तसंच या मालिकेचं आकर्षण आहे ते म्हणजे VFX. या मालिकेतील VFX बघण्या आणि अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे. या मालिकेचं पटकथा लेखन करत आहे चेतन सैंदाणे आणि याचे संवाद लिहिले आहेत पूर्णानंद वांढेकर यांनी, तर मालिकेचे निर्माते आहेत आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे. मालिकेचे  दिग्दर्शक आहे जयंत पवार.

मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेंव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट! 'तुला जपणार आहे' ही नवी मालिका 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget