Marathi Actress : 'टीम फिनिशर', हार्दीक पांड्याच्या कर्णधार पदावर कलाविश्वातूनही नाराजीचे सूर; मराठी अभिनेत्रींचा व्हिडिओ व्हायरल
Marathi Actress : हार्दीक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये बरीच नाराजी दिसून येत आहे. त्यातच आता दोन मराठी अभिनेत्रींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Marathi Actress Video on Hardik Pandya Captaincy : आयपीएलचा (IPL 2024) हंगाम सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांमध्ये बरीच नाराजी पाहायला मिळत आहे. हार्दीक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केल्यानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते चांगलेच नाराज झालेत. त्यातच कलाविश्वातून देखील बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. नुकतच एका अभिनेत्रीने हार्दीक पांड्यावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा दोन मराठी अभिनेत्रींनी पोस्ट करत हार्दीक पांड्यावर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि हैदराबादबरोबर सामने झालेत. पण या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हार्दीक पांड्यांच्या कर्णधार पदावर आणखी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यातच झी मराठीवरील सुरु असलेल्या मालिकेतील अभिनेत्रींनी रिल करत हार्दीक पांड्याचा टीम फिनिशर असा उल्लेख केला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
अभिनेत्रींचा रिल व्हायरल
झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि एकता डांगर या दोघींनी हे रिल केलं आहे. यामध्ये त्यांनी हार्दीक पांड्या हा बेस्ट फिनिशर नाही तर टीम फिनिशर असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावर कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच या व्हिडिओवर त्यांनी म्हटलं की, हार्दीक पांड्या कॅप्टन बना ये साल, पता चला टीम ही ना रही अगले साल, असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे कलाविश्वातूनही हार्दीक पांड्याच्या कर्णधार पदावर नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
गुजरातच्या परभावानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मुंबईच्या पहिल्या पराभवानंतर एका मराठी अभिनेत्री हार्दिकसाठी पोस्ट लिहिली.या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट लिहिली. दिप्ती देवीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. यामध्ये तिनं म्हटलं की, 'भाई पांड्या तू दिल से अभी तक गुजरात के साथ हैं.' दीप्तीची ही पोस्ट सोशल मीडियावरही बरीच व्हायरल झाली.