Marathi Actress : आयपीएल सामन्यात मुंबईचा गुजरातकडून पराभव; मराठी अभिनेत्रीची हार्दिक पांड्यासाठी पोस्ट, म्हणाली 'तू अजूनही...'
Marathi Actress Social Media Post : मराठी अभिनेत्रीने मुंबई इंडियन्स पहिली मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्यासाठी पोस्ट लिहिली आहे.
Marathi Actress Social Media Post : आयपीएलचा (IPL) हंगाम सुरु झाला असून रविवार 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) हा सामना खेळवण्यात आला. यामध्ये गुजरातने मुंबईवर 6 धावांनी विजय मिळवला. खरंतर यंदाचा आयपीएलचा हंगाम हा सुरुवातीपासूनच चर्चेत आलाय. कारण यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आलंय. हार्दीक पांड्या याआधी मुंबईतच होता. पण त्यानंतर त्याच्यावर गुजरातच्या संघाची जबाबदारी आली. पण पुन्हा एकदा हार्दीकने मुंबईच्या संघात पुनरागमन करत कर्णधार पद स्विकारलं. मुंबईच्या पहिल्या पराभवानंतर एका मराठी अभिनेत्री हार्दिकसाठी पोस्ट लिहिली.
या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट लिहिली. हार्दिक मुंबईच्या संघाचा कर्णधार झाल्यापासूनच रोहितच्या चाहत्यांमध्ये बरीच नाराजी दिसून येत आहे. दरम्यान रोहितच्या चाहत्यांना हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाचा कर्णधार झाला हे मान्य नाही हे सुरुवातीपासून लक्षात आलंय. त्यामुळे या अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ती देखील रोहितची चाहती असल्याचं स्पष्ट होतंय.
अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
दिप्ती देवी या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं म्हटलं की, 'भाई पांड्या तू दिल से अभी तक गुजरात के साथ हैं.' दीप्तीची ही पोस्ट सोशल मीडियावरही बरीच व्हायरल होतेय. मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांची बरीच निराशा झाला. पण त्यामुळे सोशल मीडियावरही मिम्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळालं.
गुजरातचा मुंबईवर विजय
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 2024 च्या आयपीएलची पाचवी मॅच पार पडली. अखेरच्या ओव्हरपर्यंत कधी मॅच कोण जिंकणार याचा अंदाज येत नव्हता. मुंबईची स्थिती 12 व्या ओव्हरपर्यंत एकहाती मॅच जिंकणार अशी होती. मात्र, 13 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर मुंबईच्या 129 धावा झालेल्या असताना डेवाल्ड ब्रेविस बाद झाला. यानंतर मुंबईच्या बॅटसमनच्या विकेटची मालिका सुरु झाली. डेवाल्ड ब्रेविसला बाद करणाऱ्या मोहित शर्मानं टीम डेविडला बाद केलं. मोहित शर्माचा स्पेल आणि हार्दिक पांड्याचा डेविड अगोदर बॅटिंगला न येण्याचा निर्णय हा मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरला.