Pakistan : जंगलात पेटला वणवा, पण आग विझवायची सोडून बयानं टिक-टॉक व्हिडीओ केला, नेटकऱ्यांचा संताप
हुमैरा असगर (Humaira Asghar) या पाकिस्तानी टिक-टॉक स्टारचा जंगलामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला.
Pakistan : सध्या पाकिस्तान (Pakistan) हा देश हिटवेवचा सामना करत आहे. यावर्षी पाकिस्ताननं उष्णतेचा 61 वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी 48 डिग्री तापमान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील एबटाबाद जंगलामध्ये भीषण आग लागली होती. आता हुमैरा असगर (Humaira Asghar) या पाकिस्तानी टिक-टॉक स्टारचा जंगलामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी हुमैरावर भडकले आहेत. अनेक लोक तिला या व्हिडीओमुळे ट्रोल करत आहेत.
हुमैरा असगरनं तिचा व्हिडीओ शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'जिथे मी जाते तिथे आग लागते.' या व्हिडीओमध्ये जंगलामध्ये आग लागलेली दिसत आहे. रीना खान यांनी हुमैराचा हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'टिक टॉकवरील हा त्रासदायक आणि विनाशकारी ट्रेंड आहे! केवळ चार फॉलोवर्ससाठी तरुण पिढी उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये आग लावत आहे.' इस्लामाबाद वाइल्डलाइफ मॅनेजमेंट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, 'हुमैरानं व्हिडीओ शूट करण्याऐवजी आग विझवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता.' नुकतेच हुमैरा असगरनं हे स्पष्ट केले की, तिने आग लावली नाही आणि व्हिडिओ शूट करत असताना कोणतेही नुकसान झाले नाही.
This is a disturbing & disastrous trend on Tik Tok! Young people desperate 4 followers are setting fire to our forests during this hot & dry season! In Australia it is lifetime imprisonment for those who start wildfires. We need to introduce similar legislation @WildlifeBoard pic.twitter.com/RGMXnbG9f1
— Rina S Khan Satti (@rinasaeed) May 17, 2022
बाल क्लायमेट रिस्क इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान हा हवामान बदलाच्या बाबतीत आठवा सर्वात असुरक्षित देश आहे. काही दिवसांपूर्वी टिक-टॉक ने त्यांच्या अधिकृत विधानामध्ये असं सांगितलं आहे की, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्या आणि धोकादायक आणि बेकायदेशीर वर्तनास प्रोत्साहन देणार्या कोणत्याही कंटेंट कोणताही टिक-टॉक युझर अपलोड करु शकत नाही.
हेही वाचा :
- Cannes Film Festival 2022: यंदाचा कान्स सोहळा असणार खास! ‘हे’ भारतीय कलाकार रेड कार्पेटवर दाखवणार जलवा!
- Cannes Film Festival 2022 : व्लादिमीर झेलेन्स्कींची चित्रपटसृष्टीला साद, म्हणाले, 'नव्या चॅप्लिन गरज '