Cannes Film Festival 2022 : व्लादिमीर झेलेन्स्कींची चित्रपटसृष्टीला साद, म्हणाले, 'नव्या चॅप्लिन गरज '
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) व्हिडीओ कॉलद्वारे एक खास मेसेज दिला.

Cannes Film Festival 2022 : चित्रपट विश्वातील सर्वात महत्त्वाच्या महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival 2022) 75व्या पर्वाला मंगळवारी (17 मे) सुरुवात झाली. हा सोहळा 28 मे पर्यंत चालणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) व्हिडीओ कॉलद्वारे एक खास मेसेज दिला.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी व्लादिमीर झेलेन्स्की यांनी चित्रपट आणि वास्तविकता यांच्यामधील संबंधाबाबत सविस्तर सांगितलं. 'फ्रान्सिस फोर्ड कोपो यांचा 'एपोकॅलिप्स नाउ' आणि चार्ली चॅप्लिन यांच्या 'दरेट डिक्टेटर' या चित्रपटांपासून मी प्रेरित झालो आहे.',असं झेलेन्स्की म्हणाले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भाषणामध्ये झेलेन्स्की यांनी हास्य कलाकार चार्ली चॅप्लिन यांचा उल्लेख केला. पुढे ते म्हणाले,' आपल्याला नव्या चॅप्लिनची गरज आहे जे चित्रपटांच्या माध्यामामधून लोकांची मतं मांडेल. सिनेमा हा नेहमीच स्वातंत्र्याच्या बाजूने असला पाहिजे. जनतेचा द्वेष संपेल आणि हुकूमशहा मारले जातील. त्यांच्याकडे असलेली सत्ता जनतेकडे परत येईल.'
"C'est du cinéma que dépend notre avenir." Les mots forts de Volodymyr Zelensky pendant la Cérémonie d’ouverture du 75e Festival de Cannes.
— Festival de Cannes (@Festival_Cannes) May 17, 2022
-
"Our future depends on cinema." The strong speech of Volodymyr Zelensky during the Opening Ceremony of #Cannes2022 pic.twitter.com/DoT8TYIVAu
ईवा लोंगोरिया, ज्युलियन मूर, बेरेनिस बेजो आणि "नो टाइम टू डाय" मधील अभिनेत्री लशाना लिंचसह अनेक कलकार मंगळवारी 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. यंदाचा कान्स महोत्सव भारतासाठी खूप खास असणार आहे. कारण यंदाच्या कान्स महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
ऐश्वर्या राय,दीपिका पदुकोण,नयनतारा ,पूजा हेगडे,तमन्ना भाटिया,आदिती राव हैदरी,हिना खान ,नवाजुद्दीन सिद्दीकी,आर माधवन हे बॉलिवूडमधील कालाकार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.
हेही वाचा :
- Rang Majha Vegla : दीपिकाची खोटी आई घरी येणार! लेकीसमोर कार्तिकचं बिंग फुटणार?
- ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!
- Aishwarya Rai Bachchan : ‘कान्स’ सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय सहकुटुंब रवाना! एअरपोर्टवर दिसला खास ‘फॅमिली’ अंदाज!
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















