World Theater Day: आज जागतिक रंगभूमी दिन, जाणून घ्या मुंबईत होणाऱ्या नाटकांचे प्रयोग
जागतिक रंरभूमी दिनानिमित्त जाणून घेऊयात आज कोणत्या नाट्यगृहात कोणते नाटके पाहता येतील.

जागतिक रंगभूमी दिन : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'जागतिक रंगभूमी दिन' गेल्यावर्षी मात्र तिसऱ्या घंटेविना सुना सुनाच साजरा झाला. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागला आणि नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागचे कलाकार या नाट्यसृष्टीतील मंडळींना याचा मोठा फटका सहन करावा लागला. बंद झालेली नाट्यगृहे डिसेंबरच्या तोंडावर 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू झाली आणि व्यावसायिक रंगभूमीपासून प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मींनीही कंबर कसली.
नाटक हे मराठी माणसाचे पहिले वेड असे म्हटले जाते. मनोरंजनाची कितीही प्रगत साधनं आली तरी मराठी रंगभूमी आजही तग धरून आहे. फक्त तग धरून नाही तर नवनवीन नाटकांनी ती समृद्ध होतं आहे. नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, नवीन कलाकार येत आहेत. आज जागतिक रंगभूमीदिनानिमित्त जाणून घेऊयात आज कोणत्या नाट्यगृहात कोणती नाटके पाहायला मिळतील.
आज होणाऱ्या नाटकांचे प्रयोग
रात्री 8.30 वा. - लॉंग लाईफ - गडकरी रंगायतन, ठाणे
दुपारी 4.30 वा. -प्रेम करावं पण जपुन - कालिदास नाट्यमंदीर, मुलुंड
दुपारी 4.30 वा. - तू म्हणशील तसं - प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली
दुपारी 4.30 वा. - स्त्री - दिनानाथ पार्ले
दुपारी 4.30 वा. - वाडा चिरेबंदी - गडकरी रंगायतन, ठाणे
दुपारी 4.30 वा. - नवरा माझा भवरा - आचार्य अत्रे, कल्याण
'जागतिक रंगभूमी दिना' संदर्भात
२७ मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत 'थिएटर' आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द त्याला वापरतो.























