एक्स्प्लोर

प्रेक्षक व नाट्यकर्मींच्या सुरक्षेची काळजी घेऊनच नाट्यगृहांचे 'पडदे' उघडणार!

लॉकडाऊनमुळे बंद असलेले नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, प्रेक्षक आणि नाट्यकर्मींच्या सुरक्षेची काळजी घेऊनच राज्यातील नाट्यगृहांचे पडदे उघडणार आहेत

मुंबई - नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे अनेक मुद्दे यावर सविस्तर चर्चा व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक अलीकडेच "झूम ऍप" द्वारे संपन्न झाली. या बैठकीत 22 नाट्य निर्मात्यांनी आपली मते मांडली.

या बैठकीत सुरुवातीसच विजय केंकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गरजू नाट्यकर्मीना 1 कोटी 20 लाखांची केलेली मदत याबद्दल आभार मानले. तसेच करोना विषाणूंचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम, नाट्य निर्मात्यांपुढे आज जी आर्थिक ओढाताण निर्माण झालीय, त्यातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबईने आपल्या 28 सदस्यांना नुकतेच प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. उर्वरित गरजू सदस्यांनाही अशाप्रकारे अर्थसहाय्य देण्यात येईल, अशी माहिती प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी यावेळी दिली.

सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडचा प्रेरणादायी प्रवास

राज्यातील नाट्यगृह आणि नाट्य प्रयोग सुरू करण्यापूर्वी करावयाच्या उपाय योजना, नाट्य व्यवसायापुढच्या अडचणी लक्षात घेऊन, त्या टाळण्यासाठी ठराव एकमताने मंजूर करून पुढील निर्णय घेण्यात आले.

  • महाराष्ट्रातील नाट्यगृहातील कोविड 19 च्या महामारीमुळे थांबलेले नाटकांचे प्रयोग "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ" आणि "अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे"च्या परवानगीशिवाय सुरु करता येणार नाही. तसेच, या दोन्ही संस्थांच्या परवानगी पत्राशिवाय कोणत्याही नाट्यगृहाच्या तारखा नाट्य निर्मात्यांना दिल्या जाणार नाहीत.
  • नाटक सुरु करण्याआधी येणारा प्रेक्षक वर्ग, तंत्रज्ञ आणि कलाकार त्यांच्या करोना आजाराच्या संदर्भात त्यांच्या शारीरिक उपाययोजना काय असतील आणि त्या काय असायला पाहिजेत. यावर मान्यवरांचा सल्ला घेऊनच नाट्यगृहात प्रयोग सादर करावेत.
  • सध्या नवीन प्रकार आलेल्या "ओटीटी प्लॅटफॉर्म"मध्ये 10 जून 2020 नंतर कुठल्याही निर्मात्याने नवीन नाटक देऊ नये. (कारण 'ओटीटी प्लॅटफॉर्म' नाट्य व्यवसायासाठी नुकसानकारी आहे.)

हे निर्णय नाट्य व्यवसायाच्या हिताचे असल्याने, त्यांचे पालन नाट्य निर्मात्याप्रमाणेच नाट्यगृहाशी संबंधित सर्व शासकीय व सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा'तर्फे जाहीर करीत आहोत, असे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी संगितले.

या निर्णयाचे ठराव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, महानगरपालिका आयुक्त-मुंबई व पुणे; तसेच उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृह संबंधित शासकीय प्रमुख अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत.

Sushant Singh Rajput commits suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

महत्त्वाच्या बातम्या

वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या, म्हणाल्या, 'तुम्हाला खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी बोर्ड लावते'; नवी मुंबई एअरपोर्टवरजवळ काय घडलं?
वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या, म्हणाल्या, 'तुम्हाला खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी बोर्ड लावते'; नवी मुंबई एअरपोर्टवरजवळ काय घडलं?
Swapnil Rajshekhar Shares Post: विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
Leena Bhagwat Share Photo From Hospital: 'आवाजावर ताण यायला सुरुवात झाली अन्...'; मराठी अभिनेत्रीचा रुग्णालयातला फोटो समोर, पोस्ट करत सांगितलं, 'काहीच बोलता येणार नाही...'
'आवाजावर ताण यायला सुरुवात झाली अन्...'; मराठी अभिनेत्रीचा रुग्णालयातला फोटो समोर, पोस्ट करत सांगितलं, 'काहीच बोलता येणार नाही...'
Priya Bapat on Natak: '...अन् प्रयोग थांबवला', नाटकामध्येच पल्लवी वाक्य विसरली; प्रिया बापटने मागितली प्रेक्षकांची माफी, काय घडलं होतं?
'...अन् प्रयोग थांबवला', नाटकामध्येच पल्लवी वाक्य विसरली; प्रिया बापटने मागितली प्रेक्षकांची माफी, काय घडलं होतं?

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Embed widget