एक्स्प्लोर

Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना

Jat Kanthi Crime News : सांगलीतील कंठी येथे दिवाळीच्या सुट्टीसाठी माहेरी आलेल्या 30 वर्षीय उच्चशिक्षित विवाहित महिलेला प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कंठी गावाजवळ असलेल्या मोटेवाडी येथील खरात वस्तीवर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय विवाहित महिलेला धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृणपणे संपवण्यात आलं. सौ. राजाक्का काशीराम खरात (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेला संशय आणि भेटण्यास तसेच फोन उचलण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकरानेच हे भयानक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

या घटनेनंतर जत पोलिसांनी (Jat Police) तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य संशयित आरोपी मनोज हिम्मतराव कोळेकर (रा. कंठी, ता. जत) याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजाक्का यांचे माहेर जत तालुक्यातील बागेवाडी येथील असून त्यांचा विवाह 8 वर्षांपूर्वी कंठी येथील काशीराम खरात यांच्याशी झाला होता. त्यांचे आई-वडीलही कंठी येथेच राहतात. उच्चशिक्षित असलेल्या राजाक्का या पुण्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करण्यासोबतच खासगी क्लासेस घेत होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या सुमारे 10 दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राजाक्का यांचे कंठी परिसरातील मनोज कोळेकर या तरुणासोबत गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रविवारी मनोजने राजाक्का यांना वारंवार फोन केले. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त झालेल्या मनोजने थेट खरात वस्तीवरील त्यांच्या घरी धाव घेतली आणि राजाक्का यांच्या पोटावर व शरीरावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात राजाक्का यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण थरार त्यांच्या आईसमोरच घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दारूच्या नशेत कृत्य

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस तपासात या घटनेमागील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:

मुख्य संशयित आरोपी मनोज कोळेकर आणि त्याचा साथीदार हे घटनेच्या वेळी दारूच्या नशेत होते. राजाक्का आपल्याला सोडून इतर कोणाशी तरी जवळीक साधत असल्याचा संशय मनोजला होता, तसेच त्यांनी भेटण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केले. 

हत्या केल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी जवळच्याच एका उसाच्या फडात जाऊन लपून बसले होते. मात्र, जत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत दोघांच्याही मुसक्या आवळल्या. सध्या जत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget