Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
पुण्यातल्या पुतळा अनावरण सोहळ्याच्याच दिवशी मुंबईत रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली... अजितदादांच्या अपघाती निधनाचा सातत्यानं पाठपुरावा करणारे रोहित पवार यांनी आज आणखी एक गंभीर आरोप केला... काही दिवसांपूर्वी त्यांनी एक मफलर मॅनचा उल्लेख केला होता... आजच्या पत्रकार परिषदेत हा मफलर मॅन कोण, हे त्यांनी सांगितलं अन् पुन्हा राजकीय वादळ उठवलं... विमान कंपनीच्या मालकाच्या लग्नात मफलर घालून गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो त्यांनी दाखवला... त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार करायला सुरुवात केलीय... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...
रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आरोप केलेत खरे...
मात्र त्यांचे दावे सरकमस्टन्शियल, म्हणजे परिस्थितीजन्य आहेत हेदेखील नाकारता येणार नाही...
अजितदादांच्या विमान अपघाताची सुरू असलेली चौकशी लवकर मार्गी लागल्यानंतरच हा प्रश्नांचा गुंता सुटू शकेल...
All Shows































