एक्स्प्लोर

Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nana Patekar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं निधन झालं. दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Nana Patekar Passes Away

1/16
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं निधन झालं. दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

2/16
गोव्यामध्ये (Goa News) नाना पाटेकरांनी (Nana Patekar) अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नानांच्या अकाली एक्झिटनं मनोरंजनसृष्टी पोरकी झालीय.

3/16
हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.

4/16
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले.

5/16
नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत 'नटसम्राट' हा सिनेमा विशेष गाजला.

6/16
खरं तर 'नटसम्राट' म्हटलं तर, जुन्या पिढीला रंगभूमीवरचे श्रीराम लागू आठवतात. पण, सिनेमे पाहून मोठे झालेल्या पिढीला, जर विचारलं तर मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर रुपेरी पडद्यावर 'नटसम्राट' मोठं करणारे नाना पाटेकरच उभे राहतात.

7/16
नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यांच्या नाटकांचा उल्लेख करायचा झाला तर, 'पुरुष' मध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि 'हमीदाबाईची कोठी' नाटकात साकारलेला सत्तार अजरामत केलाय.

8/16
त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या 'गमन' या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

9/16
नाना पाटेकर यांनी 'गमन' 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत.

10/16
पुढे आठ वर्ष नाना सिनेमात मिळेल ती भूमिका करत राहिले 'गिद्ध', 'भालू', 'शीला' या सिनेमांतही नानांनी काम केलेलं. यांपैकी एकही सिनेमा विशेष कमाई करू शकला नाही.

11/16
राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आज की आवाज' सिनेमात नाना पाटकेर सहनायक होते. नानांच्या कामाचं कौतुक झालं, पण सिनेमा काही चालला नाही.

12/16
नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती, दिग्दर्शन असलेला 'अंकुश' हा सिनेमा. 1986 मध्ये आलेल्या सिनेमात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.

13/16
1987 मध्ये आलेल्या एन. चंद्रा यांच्या 'प्रतिघात'मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता सिनेमाची नायिका होती. 1989 मध्ये आलेल्या 'परिंदा' सिनेमात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली.

14/16
1992 मध्ये 'तिरंगा' सिनेमाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. 'तिरंगा'मधले डायलॉग्ज खूप गाजले आणि नाना पाटेकर घराघरांत पोहोचले.

15/16
1988 मधील 'सलाम बॉम्बे!' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने नानांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. मात्र 1989 मधील 'परिंदा' हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला.

16/16
या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार

Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!

Embed widget