Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Maha Pulse AI Kolhapur Health System : जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 104 शासकीय आरोग्य संस्थांवर आता AI च्या माध्यमातून रिअल-टाइम देखरेख ठेवली जाणार आहे. हा राज्यातील पहिलाच जिल्हास्तरीय प्रकल्प आहे.

कोल्हापूर : राज्याच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेत (Health Department) पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांवर आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) करडी नजर असणार आहे. राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' (Maha Pulse AI) या जिल्हास्तरीय आरोग्य प्रकल्पाचा आज कोल्हापुरात दिमाखात शुभारंभ करण्यात आला.
राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या संकल्पनेतून आणि आयआयटी मंडीच्या (IIT Mandi) तांत्रिक सहकार्याने हा नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील तब्बल 104 शासकीय आरोग्य संस्था एकाच जिल्हा कमांड सेंटरशी जोडल्या गेल्या आहेत.
Maha Pulse AI Project Features : कशी काम करणार ही AI यंत्रणा?
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णालयांमध्ये यापूर्वीच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हे AI तंत्रज्ञान काम करणार आहे. या प्रणालीद्वारे खालील बाबींवर रिअल टाइम (Real-Time) लक्ष ठेवले जाईल.
डॉक्टरांची उपस्थिती आणि रुग्णसेवा : रुग्णालयातील डॉक्टरांची वेळेवर उपस्थिती, रुग्णांची गर्दी, ओपीडीमधील (OPD) रांग व्यवस्थापन आणि रुग्णांचा प्रतीक्षा वेळ (Waiting Time) यावर AI लक्ष ठेवणार आहे.
स्वच्छता आणि हाऊसकीपिंग : रुग्णालय परिसरातील स्वच्छता आणि हाऊसकीपिंगच्या कामांवरही या यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
आपत्कालीन स्थितीत तात्काळ अलर्ट : रुग्णालयात एखादा रुग्ण अचानक चक्कर येऊन कोसळल्यास किंवा आग अथवा धूर निर्माण झाल्यास AI प्रणाली संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने धोक्याचा अलर्ट पाठवणार आहे.
District Command Center Dashboard : एकाच डॅशबोर्डवर 104 रुग्णालयांचा आढावा
या संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक अत्याधुनिक कमांड सेंटर (Command Center) उभारण्यात आले आहे. या कमांड सेंटरमधील एकाच डॅशबोर्डवरून जिल्ह्यातील सर्व 104 आरोग्य संस्थांमधील परिस्थितीचा आढावा घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या डॅशबोर्डचा ॲक्सेस दिला जाणार आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या कामकाजावर प्रशासकीय देखरेखीसोबतच सामाजिक नियंत्रणही राहणार आहे. या प्रकल्पामुळे सर्वसामान्य रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप





















