एक्स्प्लोर

Sanjay Mone on Aamne Samne: 'निर्मात्याला तोटा झाला की कला अन् फायदा झाला की...'; 'आमने सामने' वादात संजय मोनेंची क्रिप्टिक पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Sanjay Mone on Aamne Samne Natak: 'आमने सामने' नाटकाच्या वादात संजय मोनेंची सूचक पोस्ट व्हायरल.

Sanjay Mone Reaction on Aamne Samne: मराठी रंगभूमी तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये सध्या 'आमने सामने' (Aamne Samne) या नाटकाची विशेष चर्चा सुरू आहे.   मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही.   पण  'आमने सामने' या नाटकाची (Aamne Samne Natak)  वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरू आहे. या नाटकातील कलाकारांमधील मानधनवाढीचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.  रोहन गुजर (Rohan Gujar) आणि केतकी पालव (Ketaki Palav) या दोन्ही नाटकातील कलाकारांनी मानधन वाढवून मागितल्यामुळे एका रात्रीत नाटकातून रिप्लेस  केलं असल्याचा आरोप केला. यानंतर नाटकाची निर्माते आणि  अभिनेत्री लीना भागवत (Leena Bhagwat) आणि अभिनेते  मंगेश कदम (Mangesh kadam) यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं.  हा वाद समोर येताच, अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली. आता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

संजय मोनेंची सूचक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Sanjay Mone Reaction on Aamne Samne Natak Controversy)

'आमने सामने'  नाटकाच्या मानधनवाढीच्या वादावर अनेक सिनेकलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी या प्रकरणावर आपली व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया दिली होती. यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचीही प्रतिक्रिया मुलाखतीतून समोर आली.  काहींनी पोस्टद्वारे नाटकातील निर्मात्यांना खडेबोल सुनावले.  तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी  कलाकार आणि निर्मात्यांमध्ये  समन्वय असणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता अभिनेते संजय मोने यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी 'निर्मात्याला तोटा झाला की , त्याला कला आठवते आणि फायदा झाला की व्यवसाय आठवतो', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

अभिनेते संजय मोने यांनी अलिकडेच आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये कोणत्याही नाटकाचे किंवा कलाकारांचे थेट नाव घेतलेले नाही. पण संजय मोनेंची ही पोस्ट अप्रत्यक्षपणे 'आमने सामने'  या नाटकाच्या संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. संजय मोनेंच्या पोस्टचा संदर्भ थेट नाटकाच्या वादाशी जोडला जात आहे.  सध्या संजय मोनेंची ही सूचक पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.   संजय मोनेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'निर्मात्याला तोटा झाला की, त्याला कला आठवते आणि फायदा झाला की, व्यवसाय आठवतो. मग कलाकारांना असं वाटलं तर,  ते गैर आहे की बरोबर?' असा थेट सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला.  त्यांच्याकडून शेअर करण्यात आलेली ही पोस्ट नाटकाच्या संबंधित असल्याचं काहींचं म्हणणं आहे. 

सध्या संजय मोने यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिसाद येत असल्याचं पाहायला मिळत आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, 'आमने सामने'  या नाटकामध्ये रोहन गुजर आणि केतकी पालव यांच्या जागी आता दुसऱ्या कलाकारांना एन्ट्री देण्यात आली आहे.  तेजस राऊत आणि ऋजुता धारप यांची 'आमने सामने' या नाटकात वर्णी करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या नाटकात नव्या कलाकारांना प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sachin Pilgaonkar on Marathi Movie: 'मुंबईपेक्षा पुण्यात मराठी चित्रपट जास्त चालतो'; मराठी चित्रपटांबाबत सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
Advertisement

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
Embed widget