Pushkar Shrotri : पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
Pushkar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा यंदाचा वाढदिवस खूपच खास असणार आहे. त्याचं 55 वं नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.
Pushkar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) ‘हॅप्पी गो लकी’ स्वभावामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने भन्नाट योग जुळून आणला आहे. पुष्करचा यंदाचा वाढदिवस खास ठरणार आहे. ‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर वेगळी ‘उंची’ गाठण्यास सज्ज आहे.
अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा 30 एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला 55वा वाढदिवस साजरा करत असताना याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या 55 व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने करणार आहे. आपल्या 32 वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारा पुष्कर या नाटकात ‘अतरंगी’ भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी ‘उंची’ गाठणार आहे. ती उंची कशी गाठणार? हे पाहण्यासाठी ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक पाहावं लागणार आहे.
‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’ (Pushkar Shrotri New Marathi Drama)
‘पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्करने सांगितले’. माझ्यासाठी 30 एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकासाठी सुद्धा तारीख खास ठरावी. नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद देत ‘आज्जीबाई जोरात’चे जोरात स्वागत करावे, अशी आशा पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली.
View this post on Instagram
लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं कोरं AI बालनाट्यरंगभूमीवर घेऊन येतायेत. जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे. हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. पुष्कर श्रोत्रीच्या या नव्या नाटकाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी गाजवण्यासाठी पुष्कर श्रोत्री सज्ज आहे.
संबंधित बातम्या