Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
Buldhana News: बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरणी आज ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार आहे.
Buldhana Bald Virus : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 12 ते 15 गावात केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर येऊन आता पंधरा दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही आरोग्य प्रशासनाला याच्या कारणाचा अद्यापही ठाव ठिकाणाला लागला नाही. तर निदान करण्यातही आरोग्य प्रशासन अद्याप अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेचं अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस आयसीएमआरचं पथक या परिसरात दौरा करत आहे.
साधारणतः दुपारी बारा वाजता हे पथक या परिसरात दाखल होणार आहे आणि केस गळतीच्या कारणांचा शोध घेणार आहे. सुरुवातीला हे फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, अद्यापही आरोग्य प्रशासनाला याचं निदान करणं शक्य झालेलं नाही.
केस गळती प्रकरण नेमकं काय?
- 26 डिसेंबर रोजी या परिसरातील अनेकांच्या डोक्याला खाज येऊन सुरुवातीला केस गळती व नंतर तीन ते चार दिवसात टक्कल पडण्यास सुरुवात झाली.
- सर्वप्रथम एबीपी माझा ने ही बातमी उजेडात आणल्यानंतर प्रशासन खळबळून जागं झालं.
- आरोग्य प्रशासनाने तात्काळ या भागात सर्वेक्षण सुरू केलं या भागातील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले.
- आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांचे पथक या भागात दाखल झालं त्यांनी या भागातील रुग्णांचे रक्ताचे व त्वचेचे नमुने तपासणीसाठी पाठवले.
- पाण्याच्या नमुन्यात नायट्रेट्स व टीडीएस चे प्रमाण वाढलेला आढळलं.
- सुरुवातीला आरोग्य प्रशासनाने हे फंगल इन्फेक्शन असल्याची शक्यता वर्तवली तर काहींनी पाण्यामुळे केस गळती होत असल्याचे सांगितलं.
- या परिसरातील पाण्याचे नमुने नाशिक व अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे ज्याचा अहवाल एक आठवड्यानंतर येणार आहे.
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या भागाचा दौरा केला.
- दरम्यान अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने त्वचेचे व रक्ताचे नमुने तपासले असता यात कुठलंही फंगल इन्फेक्शन अथवा रक्तात कुठलेही दोष आढळून आल्या नसल्याचा अहवाल दिला आहे.
- दरम्यान केस गळतीचे रुपन दररोज वाढतच असल्याने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्राची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीएमआरला या भागाचा दौरा निर्देश करण्याचे आदेश दिलेत.
- आज आयसीएमआर चेन्नई आणि दिल्लीचे पथक या परिसरात भेट देऊन केस गळतीच्या कारणांचा शोध घेणार आहे.
- दरम्यान अद्यापही आरोग्य विभागाला केस गळती का होत आहे याचं निदान करणे शक्य झालं नाही त्यामुळे आरोग्य विभागाचे हात अद्यापही रिकामीच आहेत.
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून मी शेगाव तालुक्यातील जवळपास पंधरा गावात केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार सुरूच आहे आरोग्य प्रशासनाने या परिसरात सर्वेक्षण सुरू करून तात्पुरता उपचारही केला आहे. मात्र अद्यापही केस गळती सुरूच असून काल मिशी आणि हातावरील केस गळण्याचे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमका हा कुठला आजार आहे. यावर ठोस अद्यापही आरोग्य प्रशासनाला सांगता येत नाही, आज आयसीएमआर चा पथक या भागाचा दौरा करून नेमका काय अहवाल सादर करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.