State Drama Competition: हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा
State Drama Competition: जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण 674 संघ भाग घेणार आहे.
लातूर: कोविडमुळे लांबलेल्या राज्य नाट्य स्पर्धाला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून नाट्य रसिकांकडून या स्पर्धा कधी होणार आहेत याची आतुरता आज अखेर संपली आहे. राज्यातील 34 केंद्रावर या स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे. राज्याभरातील 674 संघ यात सहभागी होणार आहेत.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा आज पासून राज्यातील 19 केंद्रांवर घेण्यात येत आहे. कोविडमुळे या स्पर्धा सतत लांबणीवर पडत होत्या.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेत या स्पर्धा सर्व नियम पाळत घेण्याचा ठरवले होते. त्यास या स्पर्धेत असलेल्या सर्व स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आज 19 केंद्रांवर या स्पर्धा एकाच वेळी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृह केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने आणि 'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व आहे.
आज या स्पर्धेतील पाहिले नाटक "तोच ..पण गोष्ट निराळी" सादर होणार आहे. ओमायक्रॉन आणि कोविड-19 विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी राज्य नाट्य स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आज 21 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धा 5 मार्च पासून तर बालनाट्य स्पर्धा 10 मार्च पासून आयोजित करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील 34 केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण 674 संघ भाग घेणार आहे.
लातूर येथील स्पर्धेला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. नाट्य रसिकांनी ही उत्तम प्रतिसाद देत स्पर्धकांचा जोश वाढवला आहे. "राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र पहिल्यांदाच लातूरला मिळाले आहे. यामुळे जिल्ह्यातील आणि या भागातील नाट्य कलावंत, नाट्य रसिकांना खूप आनंद झाला आहे. कोविड काळात नाट्य जगतात आलेली मरगळ या स्पर्धेमुळे दूर होईल यात कोणतेही शंका नाही " असे मत लातूर येथील नाट्य कलावंत बाळकृष्ण धायगुडे यांनी व्यक्त केले आहे
'तोच ..पण गोष्ट निराळी' या नाटकाचे दिग्दर्शक प्रदीप भोकरे यावेळी खूप आनंदित होते. त्यांचे हे दोन अंकी नाटक आज शुभारंभला स्पर्धेत दाखविण्यात येत आहे. "दोन वर्षे झाली आम्ही नाट्य स्पर्धेची वाट पहात आहोत. स्पर्धा होणार की नाही अशी शंका असताना तारीख देण्यात आली. यावेळी ही तारीख पुढे जाणार असे वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही. आम्ही तयारी पूर्ण केली आहे." असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha