Chuk Bhul Dyavi Ghyavi : 'चुकभूल द्यावी घ्यावी'; नाटकाचा प्रयोग पाहा अन् मसाला दूधाचा आस्वाद घ्या
Chuk Bhul Dyavi Ghyavi : कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' या नाटकाच्या टीमने खास प्रयोगाचं आयोजन केलं आहे.
Akshaya Naik New Marathi Drama Chuk Bhul Dyavi Ghyavi : बालगंधर्वांच्या संगीत नाटकावेळी प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत अत्तर लावून केलं जायचं. त्याच धर्तीवर आता अक्षया नाईक (Akshaya Naik) व अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'चुकभूल द्यावी घ्यावी' (Chuk Bhul Dyavi Ghyavi) या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे.
कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' टीमची अनोखी कल्पना
कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' या नाटकाच्या टीमने खास आयोजन केलं आहे. कोजागिरीनिमित्त 28 ऑक्टोबरला रात्री आठ वाजता दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना नाटका सोबत मसाला दुधाचा आस्वाद घेता येणार आहे.
गोड नात्यांची मिश्किल गोष्ट 'चुकभूल द्यावी घ्यावी'
दिलीप प्रभावळकर लिखित 'चुकभूल द्यावी घ्यावी' या नाटकात गोड नात्यांची मिश्किल गोष्ट पाहायला मिळत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.
View this post on Instagram
प्रासंगिक आणि अस्सल विनोद असलेले नाटक 'चूक भूल द्यावी घ्यावी' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. अभिनय, नाटकाचे नेपथ्य प्रकाशयोजना संगीत तसेच दिग्दर्शन सगळ्यांच बाजूने नाटक सर्वोत्तम झाले असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील ह्या नाटकाला मिळत आहे. त्यामुळे 'चूक भूल द्यावी घ्यावी' म्हणत यंदाची कोजागीरी प्रेक्षकांच्या साथीने साजरी करण्यात येणार आहे. 28 ऑक्टोबरला रात्री आठ वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद आणि दुधाचा आस्वाद घेऊन कोजागरी साजरी करता येणार आहे.
'सुंदरा मनामध्ये भरली' (sundara manamadhe bharli) या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता अक्षयाचं 'चूक भूल द्यावी घ्यावी' हे नवं नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
संबंधित बातम्या