एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंनी पोस्ट शेअर करुन दिली हेल्थ अपडेट; 'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान झालेली दुखापत

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दुखापत झाली. आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेल्थ अपडेट दिली आहे.

Amol Kolhe :  डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. कराडमधील कल्याणी मैदानावर झालेल्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत झाली. या प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.  पण मस्ट गो ऑन म्हणत त्यांनी पुढे प्रयोग सादर केला. आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेल्थ अपडेट दिली आहे.

अमोल कोल्हे यांची पोस्ट

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमोल  कोल्हे हे रुग्णालयात दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी या फोटोला कॅप्शन दिलं,  'काळजी करण्यासारखे काही नाही !!! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती... परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू " 11 मे ते 16 मे  हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे "शिवपुत्र संभाजी"  महानाट्य!'   

View this post on Instagram
 
A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

सुप्रिया सुळे यांनी अमोल कोल्हे यांच्या पोस्टला 'hope all ok' अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता  सुयश टिळक अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी देखील अमोल कोल्हे यांच्या पोस्टला कमेंट केली आहे.

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात.  त्यांना  इन्स्टाग्रामवर 870K फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.  'राजा शिवछत्रपती', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता' या ऐतिहासिक मालिकांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी काम केलं आहे. अमोल कोल्हे यांच्या आगामी चित्रपट आणि नाटकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग पिंपरी येथे होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत; 'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान अपघात; शो मस्ट गो ऑन म्हणत पुढचा प्रयोग करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझाChandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
Embed widget