The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर सलमान खानची रिअॅक्शन; म्हणाला....
रितेश देशमुख, सुनील शेट्टी आणि आमिर खान या कलाकारांनी देखील 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
![The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर सलमान खानची रिअॅक्शन; म्हणाला.... The Kashmir Files salman khan reaction after watching film The Kashmir Files The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर सलमान खानची रिअॅक्शन; म्हणाला....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/28/3698ed68a7d63c59a7f738135956ee2f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Kashmir Files : सध्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनेक कलाकारांनी तसेच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाचं कौतुक केलं. रितेश देशमुख, सुनील शेट्टी आणि आमिर खान या कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) देखील या चित्रपटाचे कौतुक करत आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला सलमान खानची पसंती मिळाली. या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, सलमाननं त्यांना फोन केला आणि चित्रपटाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केलं. सलमान आणि अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रेम रतन धन पाओ, जान-ए-मन आणि हम आपके है कौन या चित्रपटांमधून अनुपम आणि सलमान यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई
'द कश्मीर फाइल्स' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. 250 कोटी हे या चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन आहे. याबाबात विवेक अग्निहोत्री यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'या चित्रपटाने 252.45 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या रविवारी भारतात 7 कोटी 60 लाख रुपये आणि परदेशात 2.15 कोटी रुपये कमावले.’
हेही वाचा :
- Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
- Oscar 2022 : ऑस्कर सोहळ्याला गालबोट, पत्नी जॅडा स्मिथवरील कमेंटमुळे भडकला सुपरस्टार विल स्मिथ, ख्रिस रॉकच्या लगावली कानाखाली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)