(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आजच्या दिवशी प्रदर्शित झाला पहिला बाँडपट; असा आहे 26 चित्रपटांचा प्रवास
आजच्या दिवशी 1962 साली पहिला बाँडपट प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत एकूण 26 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
आजच्या दिवसाचे वैशिष्ट्ये म्हणजे रसिकांच्या मनावर भुरळ घालणारे ब्रिटिश गुप्तहेरचं पात्र 'जेम्स बाँड' हे धमाकेदार अॅक्शन, त्याची अनोखी शैली, साहसदृष्ये यामध्ये अत्याधुनिक अशी कार आणि बाईक त्यांचं होणारं बोटीत रूपांतर, त्यातली हत्यारं आणि कुशलतेने वेगवेगळ्या केसेसची उकल अगदी दिमाखात 'बाँड.... जेम्स बाँड...!' असं नाव सांगत रुबाबातला नायक आणि चित्रपटांमधील संगीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं अश्या बाँड पटाचा पहिला चित्रपट आज म्हणजेच 5 ऑक्टोबर 1962 साली प्रदर्शित झाला.
पाहता पाहता जगभरातील प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला आणि आजवर जेम्स बाँड नायक असलेले आजवर 24 चित्रपट आणि इतर निर्मात्यांनी केलेले दोन असे एकूण 26 चित्रपट प्रदर्शित झाले असून 27 वा बॉंडपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हे सर्व जगभर बाँडपट म्हणून ओळखले जातात.
सर्वात पहिला चित्रपट 'डॉ. नो' याचं पात्र ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी 1953 साली लिहले. जेम्स बाँडचं पात्र म्हणजे तो ब्रिटिश गुप्तहेर दाखवला आहे, त्याला सर्व मिशन वेळी 007 या सांकेतिक नावाने ओळखलं जातं.
संजूबाबाची प्रकृती खालावली; कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा फोटो व्हायरल
कादंबरीकार इयान फ्लेमिंगने बॉंडवर तब्बल 6 कादंबऱ्या व 2 लघुकथा सुद्धा लिहिल्या.
पण दुर्दैवाने 1964 मध्ये लेखक फ्लेमिंग यांचे निधन झाले, त्यांच्या मृत्यूनंतर पुढे 6 लेखकांनी बाँडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या आणि बॉंड पटांची शृंखलेस खंड पडला नाही.
आज प्रदर्शित झालेल्या पहिल्या डॉ. नो चित्रपटामध्ये जेम्स बाँडची भूमिका अभिनेता शॉन कॉनरी यांनी केली तर चित्रपटाचे दिग्दर्शन 'टेरेन्स यंग' यांनी केलं.
चित्रपटाच्या सुरुवातीचा इंट्रो आणि त्याचं विशेष संगीत 'मॉन्टी नॉर्मन' यांनी दिलं, साधारणपणे 109 मिनिटांचा हा चित्रपट तयार करण्यासाठी निर्मिती खर्च तब्बल 1 दशलक्ष डॉलर एवढा आला आणि यातून आलेलं उत्पन्न एकूण तब्बल 59.6 दशलक्ष डॉलर एवढा गल्ला या चित्रपटाने गोळा केला! यावरून अंदाजा येईल 'जेम्स'ला प्रेक्षकांनी किती पसंत केलं आणि 57 वर्षात 24+2 बाँड पटांची मालिका झाली कित्तेक नवनवे रेकॉर्ड्स नावावर केले!
सध्या सर्वात नवा बाँडपट 'नो टाइम टू डाई' हा एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार होता पण तो कोरोना प्रादुर्भाव प्रकरणामुळे पुढील वर्षी म्हणजेच 2 एप्रिल 2021 ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
आजवर वेगवेगळ्या सात अभिनेत्यांना या सर्व चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे.
Param Bir Singh PC | SSR Suicide Case | मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न : परमबीर सिंग